मराठी बातम्या /बातम्या /देश /

बंगाल हिंसाचारावर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

बंगाल हिंसाचारावर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारावर भाजपा नेते आणि चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 5 मे: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Elections 2021) तृणमूल काँग्रेसनं (TMC) दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राज्यातील हिंसाचारावर भाजपा नेते आणि चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. चक्रवर्ती यांनी या विषयावर एक ट्विट केलं असून यामध्ये 'बंगाल जळत आहे, हे सर्व थांबवा' असं आवाहन केलं आहे.

मिथुन चक्रवर्ती  यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, "निवडणुकीनंतर बंगाल जळत आहे. कृपया हिंसाचार थांबवा. मानवी जीवन हे राजकारणाच्या तुलनेक अधिक महत्त्वाचं आहे. कृपया त्यांच्या कुटुंबाचा विचार करा आणि हिंसाचार थांबवा."

राज्यपालांनी दिला सल्ला

दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील कोरोना स्थिती बिकट असतानाच राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी त्यांना राजभवनात आयोजित केलेल्या एका छोटेखानी समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

ममतांच्या शपथविधी सोहळ्यावेळी राज्यपाल जगदीप धनखर म्हणाले की, 'निवडणुकांनंतर राज्यातील हिंसाचार संपविणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. मी तिसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्री ममताजींचे अभिनंदन करतो. आता हिंसाचार संपवणे ही आपली पहिली प्राथमिकता असेल. या हिंसाचाराचा समाजातील मोठ्या घटकावर परिणाम झाला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मुख्यमंत्री तातडीने पुन्हा कायद्याचे राज्य प्रस्थापित करतील आणि हिंसाचार लवकरच आटोक्यात येईल.'

( वाचा : भयंकर! मतदान करण्यासाठी म्हणून गावी पोहोचला, कोरोनामुळे स्वत:सह आणखी 5 जणांचा मृत्यू )

पश्चिम बंगालमध्ये 292 जागांवर झालेल्या निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 213 जागा जिंकल्या, तर भाजपला विधानसभेमधील आपले सदस्य तीन वरुन 77 पर्यंत वाढविण्यात यश आले.

First published:

Tags: BJP, India, Mamata banerjee, Mithun chakraborty, TMC, Violence, West Bengal Election