मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assam Election Results : आसाममध्ये काँग्रेस परतणार की कमळ पुन्हा फुलणार? भाजप आघाडीवर

Assam Election Results : आसाममध्ये काँग्रेस परतणार की कमळ पुन्हा फुलणार? भाजप आघाडीवर

आसाम विधानसभेच्या (Assam Election Results 2021) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 7 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 02 मे : आसाम विधानसभेच्या (Assam Election Results 2021) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 20 आणि इतर 2 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. राज्यात एकूण 126 जागांसाठी मतदान पार पडलं असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 126 जागा असलेल्या आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी समाप्त होणार आहे. 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2016 च्या निवडणुकीत भाजपला 86 जागा मिळाल्या होत्या आणि सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. एक्झिट पोलनुसार आसाममध्ये पुन्हा भाजपचं सरकार येणार असल्याचं चित्र अनेकांनी दाखवलं होतं. राज्यात भाजपला 85 जागा मिळतील, असा दावा यात करण्यात आला होता. पश्चिम बंगाल (West Bengal Election), केरळ (Kerala Election), तामिळनाडू (Tamil Nadu Election), असम (Assam Election) आणि पुद्दुचेरी  या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीची (Assembly Election Results 2021) मतमोजणी आज पार पडत आहे.
First published:

Tags: Assam Election, Assembly Election 2021

पुढील बातम्या