चंदीगड, 21 मे: मोगाजवळील बाघापुराना याठिकाणी असणाऱ्या लंगियाना खुर्द या गावात भारतीय वायूसेनेचे (Indian Air Force) एक फायटर जेट मिग-21 बिसॉन (MiG-21 Bison Fighter Aircraft) दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनिंग दरम्यान पायलट अभिनव चौधरी यांनी मिग-21 (MiG-21 Fighter Aircraft) मधून राजस्थानातील सूरतगडमधून हलवारा आणि हलवारामधून सूरतगडसाठी उड्डाण केलं होतं. यावेळी बाघापुरानाच्या जवळपास त्यांचं फायटर जेट क्रॅश झालं आहे. या अपघातामध्ये पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.
There was an aircraft accident last night involving a Bison aircraft of IAF in the western sector. The pilot, Sqn Ldr Abhinav Choudhary, sustained fatal injuries. IAF condoles the tragic loss and stands firmly with the bereaved family.
— Indian Air Force (@IAF_MCC) May 21, 2021
अपघाताची माहिती मिळताच भारतीय वायूसेनेने घटनास्थळी त्यांची एक टीम पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम केल्यानंतर पायलट अभिनव यांचा मृतदेह सापडला आहे. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप ही घटना कशी घडली याबाबत ठोस कारण समोर आलेलं नाही आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे.
#BREAKING : An Indian Air Force #MiG21 fighter aircraft crashed near #Moga in #Punjab late last night. The aircraft was on a routine training sortie when the accident happened: #IAF officials#FighterJet pic.twitter.com/WpOuN3xAEx
— ज़ाहिद अब्बास ZAHID ABBAS 🇮🇳 (@abbaszahid24) May 21, 2021
दरम्याना ही घटना कशामुळे घडली याचा तपास केला जात आहे. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.