मराठी बातम्या /बातम्या /देश /

Birbhum Violence : राज्यपाल बंगालच्या विरोधात बोलतात, ममता बॅनर्जी भडकल्या

Birbhum Violence : राज्यपाल बंगालच्या विरोधात बोलतात, ममता बॅनर्जी भडकल्या

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इथं एक 'लाटसाहेब' बसले आहेत आणि प्रत्येक वेळी ते पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाईट असल्याचं विधान करतात. तत्पूर्वी, राज्यपाल जगदीप धनखर यांनी बीरभूम येथील जाळपोळीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांना फटकारलं होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

कोलकाता, 23 मार्च : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी राज्यपाल जगदीप धनखर (Governor Jagdeep Dhankhar) यांच्यावर पुन्हा एकदा बंगालच्या विरोधात बोलल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राज्यपालांना 'लाट साहेब' म्हणत टोमणा मारला आहे. हे प्रकरण बीरभूम जाळपोळीच्या (Birbhum Violence) घटनेनंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाशी संबंधित आहे. ममता यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटलं असून सरकार योग्य पद्धतीने कारवाई करेल, असं आश्वासन दिलं होतं. खरं तर, तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर, जमावानं जाळपोळ केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये रामपुरहाट भागात 10 लोकांचा मृत्यू झाला.

सरकार आमचं आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. कोणालाही त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. ही घटना दुर्दैवी आहे. मी स्वतः गुरुवारी रामपूरहाटला भेट देणार आहे. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच ओसी, एसडीपीओवर कारवाई करण्यात आली आहे.

" isDesktop="true" id="682368" >

पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाईट आहे, असं वक्तव्य तुम्ही का करता?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इथं एक 'लाटसाहेब' बसले आहेत आणि प्रत्येक वेळी ते पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाईट असल्याचं विधान करतात. तत्पूर्वी, राज्यपाल जगदीप धनखर यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आणि ते म्हणाले की, संघर्षाच्या असंवैधानिक भूमिकेचा विचार करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून लोकशाही मूल्यं आणि मानवी हक्कांना धोका पोहोचणार नाही.

ममता बॅनर्जी यांच्या पत्राला उत्तर देताना हे वक्तव्य आले आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना अनुचित विधानं करण्यापासून परावृत्त करण्याची आणि प्रशासनाला बीरभूम हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.

First published:

Tags: Mamata banerjee, Violence, West bengal