उद्धव कृष्ण, प्रतिनिधी पाटणा, 23 जुलै : काही दिवसांपूर्वी देशभरात एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणाची चर्चा आजही सुरू आहे. मात्र त्याहीपेक्षा सध्या पबजीप्रेमी सचिनच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचा दावा करत पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरण प्रचंड तापलं आहे. एका सर्वसामान्य मुलाच्या प्रेमाखातर एक सुंदर महिला आपल्या मुलांना घेऊन भारतात येते, हे काही अनेकांना पचलेलं नाही. ती पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिथे पाहावं तिथे तिचीच चर्चा आहे. इतकी की, भारतात इतरही अतिमहत्त्वाचे मुद्दे आहेत, याचा जणू सर्वांना विसर पडला आहे. बिहारमधील स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध शिक्षक डॉ. गुरू रहमान यांनीदेखील याबाबत भाष्य केलं आहे. ‘चार मुलांची आई हिंसाचाराने ओतपोत भरलेला पबजी खेळ खेळते, खेळता खेळता एका व्यक्तीच्या प्रेमात पडते. प्रेमापोटी आधी दुबईला जाते, तिथून नेपाळलमध्ये येते आणि मग भारतात दाखल होते, ही मोठी आश्चर्याची बाब आहे’, असं गुरू रहमान यांनी म्हटलं आहे. जोश टॉकमधून ते स्पर्धा परीक्षांचे धडे देतात. ज्यांना हजारो विद्यार्थ्यांची पसंती मिळते.
‘मीसुद्धा प्रेम केलं, त्याच हिंदू मुलीसोबत लग्नही केलं. आज देवाच्या कृपेने आम्हाला दोन मुलं आहेत. माझी पत्नी त्या दोघांना सांभाळण्यात दिवस-रात्र व्यस्त असते’, असं सांगून ‘चार मुलांच्या आईला एवढा वेळ मिळालाच कसा की, खेळता खेळता तिने एका परदेशातील व्यक्तीच्या प्रेमात पडावं’, असा सवाल गुरू रहमान यांनी उपस्थित केला. ‘जरी वेळ मिळाला असेल तरी पबजी हा इतका हिंसात्मक खेळ आहे की, त्यावर देशात बंदीदेखील आणण्यात आली होती. या खेळात प्रतिस्पर्धकाला गोळी मारली जाते. अशा या पबजीतून कोणावर प्रेम कसं काय जडू शकतं?’, असंही ते म्हणाले. सीमाने घातला ‘झिम्मा’, जेव्हा ATSने वाचायला सांगितलं इंग्रजी, घडलं असं काही की सगळेच हैराण त्यांनी पुढे सांगितलं की, ‘सीमा हैदर प्रकरणात आरोप-प्रत्यारोप नाही, तर कसून चौकशी होण्याची आवश्यकता आहे.’ त्याचबरोबर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं की, ‘तुमची सीमा पाकिस्तानात नाही, तर तुमची सीमा म्हणजे तुमचं ध्येय आहे. त्यामुळे बिनकामाच्या मुद्द्यांमध्ये लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका, तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष द्या.’ ‘मुख्य म्हणजे देशातून चांद्रयान-3 लाँन्च झाला. देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार, इत्यादींबाबत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत, मात्र त्यांवर लोकांना चर्चा करायची नाहीये’, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.