पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. पीडित कुटुंबांप्रती शोक व्यक्त करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात (Relief and Rescue Operations)सक्रियपणे गुंतले आहे. पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरा ट्विट केलं आणि म्हटलं की, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे खूप दुःख झाले आहे. देव शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रियपणे सहभागी आहे.
बिहार के कई जिलों में आंधी एवं बिजली गिरने की घटनाओं में कई लोगों की मृत्यु से अत्यंत दुख हुआ है। ईश्वर शोक-संतप्त परिवारों को इस अपार दुख को सहने की शक्ति दे। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन राहत और बचाव कार्य में तत्परता से जुटा है।
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2022
दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीडित कुटुंबांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला तसेच मृतांच्या आश्रितांना प्रत्येकी 4 लाख रुपये तत्काळ अनुदान देण्याचे निर्देश दिले. दिली. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला याचे खूप दुःख आहे. हे नुकसान सहन करण्याची ईश्वर शोकाकुल कुटुंबियांना शक्ती देवो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रियपणे गुंतले आहे. पीडित कुटुंबांसोबत- मुख्यमंत्री गुरुवारी वादळामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या आपत्तीच्या काळात आपण पीडित कुटुंबांसोबत आहोत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीनं देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्य के 16 जिलों में आंधी एवं वज्रपात से 33 लोगों की मृत्यु दुःखद। मृतकों के आश्रितों को तत्काल 4-4 लाख रु० अनुग्रह अनुदान देने तथा आंधी एवं वज्रपात से हुई गृह क्षति एवं फसल क्षति का आकलन कर प्रभावित परिवारों को जल्द से जल्द सहायता राशि उपलब्ध कराने का निर्देश भी दिया गया। (1/2)
— Nitish Kumar (@NitishKumar) May 20, 2022
घरी राहण्याचे आवाहन सीएम नितीश कुमार यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, खराब हवामानात सर्वांनी पूर्ण दक्षता घ्यावी. खराब हवामानाच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा. खराब हवामानात घरीच रहा आणि सुरक्षित रहा. पिकांचं नुकसान वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या सहा बोटी गंगेत बुडाल्या. सुमारे 50 मजुरांनी पोहून त्यांचे प्राण वाचवले. हवामानशास्त्रज्ञ आशिष कुमार यांच्या मते, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ आणि मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली होती. अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज त्याचवेळी बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पश्चिम ट्रफ मध्य बिहारमधून उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशातून उप हिमालयीन पश्चिम बंगालकडे जात आहे. या प्रभावामुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. या सर्व हवामानाचा परिणाम लक्षात घेता, पाटणा हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी करताना लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे.