जमूई (बिहार), 13 मार्च : मोबाईलमधील 'फ्री फायर गेम' (Free Fire) खेळताना बिहारमधील (Bihar) जमूईच्या मुलाची उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुलीशी भेट झाली. दोघांमध्ये हळू-हळू प्रेमही जुळलं. त्यानंतर मुलगी शेकडो किलोमीटर दूर तिच्या प्रियकराजवळ गेली. त्या दोघांनी लग्नही केलं. मुलाच्या घरच्या मंडळींनी देखील नव्या सुनेचा आनंदाने स्वीकार केला. इथपर्यंत अगदी फिल्मी वाटणाऱ्या गोष्टीला अचानक मोठा टर्न आला आणि आता ती मुलगी तिच्या घरी परतली आहे.
काय आहे प्रकरण?
बिहारमधील जमूई जिल्ह्यातील 11 वी मध्ये शिकणाऱ्या मुलाची ही सर्व गोष्ट आहे. 'फ्री फायर गेम खेळताना त्याची उत्तर प्रदेशातील मुलीशी भेट झाली. दोन महिन्याची ओळख आणि प्रेमसंबंध यामधून त्यांनी परस्परांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्यासाठी मुलगी बिहारमध्ये गेली. तिथं दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर ते दोघं लॉजमध्ये गेले. त्यांना लॉजमध्ये घेण्यास मालकाने नकार दिला आणि गावी पाठवून दिलं.
लॉज मालकाने प्रवेश नाकारल्याने नवं लग्न केलेलं जोडपं मुलाच्या गावी गेलं. तिथे मुलगा झोपडीमध्ये राहतो हे पाहताच मुलीला आश्चर्याचा धक्का बसला. तिने तिच्या नवऱ्याजवळ उत्तर प्रदेशात माहेरी जाण्याचा हट्ट सुरू केला. त्यानंतर मुलीनं तिच्या भावाला फोन केला आणि ती भावासोबत माहेरी निघून गेली.
( वाचा : 'हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न कायदेशीर नाही', हायकोर्टाचा निर्णय )
या प्रकरणातील मुलाने ओळख झाल्यानंतर आपण आलिशान बंगल्यात राहतो, अशी थाप मुलीला मारली होती, अशी माहिती समोर आली आहे. या अजब प्रेमाची आणि त्याच्या शेवटाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Games, Love, Marriage, Online dating, Relationship