Home /News /mumbai /

चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या हाती, CCTV मुळे आरोपींची पोलखोल

चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या हाती, CCTV मुळे आरोपींची पोलखोल

मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) चालत्या ट्रेनमध्ये लुटमारी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

    मुंबई, 27 मे: मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) चालत्या ट्रेनमध्ये लुटमारी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रात्री उशिरा मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना मुंबई बोरिवलीच्या (Mumbai Borivali GRP) जीआरपीने माहीम (Mahim) येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी धारावी (Dharavi) येथील रहिवासी आहेत. याआधीही अटक करण्यात आलेल्या आरोपींवर धारावी येथे दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून मारहाण करून लुटून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. काय आहे नेमकं प्रकरण रविवार 22 मे रोजी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात मीरा रोड येथील शंभूलाल शर्मा (46) या प्रवाशाने बोरिवली रेल्वे स्टेशनवर तक्रार केली होती. या तक्रारीत तो प्रवासी मध्यरात्री 1 वाजता मालाड ते भाईंदर लोकलच्या डब्यात एकटाच प्रवास करत होता. त्याच डब्यात घुसून तिघांनी शंभूलाल यांना चालत्या ट्रेनमध्ये मारहाण करून त्यांच्याकडील 1200 रुपये आणि मोबाईल हिसकावून पळ काढला होता. बोरिवली स्थानकात उतरल्यानंतर शंभूलाल यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. बोरिवलीचे तपास अधिकारी एपीआय पाटील आणि त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी मायकल कनक (22) शनी सिप्रे (19, दोघे रा. धारावी) याला स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली. तर तिसरा आरोपी आकाश घोडके (23) हा फरार आहे. बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पीआय अनिल कदम यांनी सांगितले की, रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या शंभूलाल यांना लुटणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही धारावी आणि माहीममध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. पुराचा कहर सुरूच; 30 जणांचा मृत्यू, 5 लाखांहून अधिक प्रभावित दरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या सामानाची आणि स्वत:ची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना एकाकी डब्यातून प्रवास करू नये, अशी विनंती अधिकारी कदम यांनी केली आहे. शक्य असल्यास मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले असतील तेथेच प्रवास करावा, असंही कदम यांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या