पाटणा, 7 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणूकीसाठीच्या (Bihar Election 2020) मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला. मतदानोत्तर चाचणीत ( Bihar Exit Poll live update) बिहारमधल्या मतदारांचा कल समोर येत आहे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या Exit Polls मध्ये सत्ताधारी नितीश कुमार यांचा सपशेल पराभव होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने जन की बात सह केलेल्या मतदानोत्तर चाचणीतही NDA पेक्षा काँग्रेस-राजदच्या महागठबंधनला अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
पोल्स ऑफ पोल्सचा निकालही नितीश कुमारांच्या विरोधात जाणारा आहे. बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांसाठी मतदार पार पडलं. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव (Tejaswai yadav) याचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला.
रिपब्लिक जन की बात चा अंदाज
एकूण जागा – 243
NDA 91-117
MGB/UPA 118-138
LJP 5-8
OTH 3
2015 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80
काँग्रेस – 27
जदयू – 71
भाजप – 53
लोजप – 2
रालोसप – 2
हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
एकूण जागा – 243
Polling concludes for Bihar assembly elections; counting of votes on November 10
— ANI (@ANI) November 7, 2020
प्रत्यक्षात तेजस्वी यादव की नितीश कुमार याचा निकाल 10 तारखेला लागणार असला तरी एक्झिट पोल्सचा अंदाज आजच स्पष्ट झाला आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे.
नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळे. LJP चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) RJD ने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि CPI(ML) ने 19 जागा लढवल्या. NDA कडून नितीश कुमारांच्या JD (U) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते.
केंद्रात भाजप बरोबर NDA चा भाग असले तरी पासवानांनी बिहारमध्ये नितीश विरोध कायम ठेवला होता. या निवडणुकीत तो आणखी तीव्र केला. एकीकडे काँग्रेस- RJD यांच्या विरोधात आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्याही विरोधात पासवान असल्याने त्यांच्या पक्षाला मिळणारी मतं कुणाला मोठं नुकसतान करतात, यावर बिहारचं भवितव्य ठरू शकतं.
निवडणुकीच्या अगदी थोडे दिवस आधी पक्ष संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. बिहारचे किंग मेकर ठरण्याची त्यांची इच्छा होती. पण मतदानोत्तर कल चाचणीत लोकजनशक्ती पक्षाला दिलेला कौल फारसा मोठा दिसत नाही.