BIHAR EXIT POLL : सर्वांत पहिला एक्झिट पोल; नितीश कुमारांसह भाजपला झटका?

BIHAR EXIT POLL : सर्वांत पहिला एक्झिट पोल; नितीश कुमारांसह भाजपला झटका?

बिहार विधानसभा निवडणूकीसाठीच्या (Bihar Election 2020) मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

  • Share this:

पाटणा, 7 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणूकीसाठीच्या (Bihar Election 2020) मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला. मतदानोत्तर चाचणीत ( Bihar Exit Poll) बिहारमधल्या मतदारांचा कल स्पष्ट झाला. मतदानानंतरचे पहिले कल हळूहळू समोर येत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह  NDA ला फक्त 116 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. याउलट राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसच्या  UPA आघाडीला 120 जागा मिळण्याची शक्यता आहे.

C Voter चा अंदाज

JDU 70

भाजप 42

RJD - 85

काँग्रेस 25

आणखी एका एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला फक्त 28 ते 35 जागा मिळू शकतात. तर भाजपला गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांना 65 ते 70 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या EXIT POLL चे निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.

राष्ट्रीय जनता दल ठरणार मोठा पक्ष

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी लढत आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव (Tejaswai yadav) याचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ABP आणि C VOTER चा अंदाज

एकूण जागा – 243

भाजप – 66-74

JDU – 38-46

RJD – 81-89

काँग्रेस – 21-29

LJP – 2

LEFT 6-13

रालोसप – 1-3

अन्य 4-8

TIMES NOW चा अंदाज

NDA 116

UPA 120

Others 07

रिपब्लिक जन की बात चा अंदाज

एकूण जागा – 243

NDA 91-117

MGB/UPA 118-138

LJP 5-8

OTH 3-

28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे.

नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत  71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळे. LJP चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) RJD ने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि CPI(ML) ने 19 जागा लढवल्या. NDA कडून नितीश कुमारांच्या JD (U) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते.

गेल्या वेळच्या बिहार विधानसभा निवडणुकीने सगळ्यांचे अंदाज चुकवले होते. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचा अनुभव त्या वेळी होता. मागच्या बिहार विधानसभेला भाजप आणि नितीश कुमार एकमेकांच्या विरोधात होते. NDA मध्ये नितीश कुमार नव्हते. त्याऐवजी ते काँग्रेस, राजदबरोबर महागठबंधनमध्ये होते.

2015 चं चित्र

RJD – 80

काँग्रेस – 27

JDU – 71

भाजप – 53

LJP – 2

रालोसप – 2

हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1

एकूण जागा – 243

केंद्रात भाजप बरोबर NDA चा भाग असले तरी पासवानांनी बिहारमध्ये नितीश विरोध कायम ठेवला होता. या निवडणुकीत तो आणखी तीव्र केला. एकीकडे काँग्रेस- RJD यांच्या विरोधात आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्याही विरोधात पासवान असल्याने त्यांच्या पक्षाला मिळणारी मतं कुणाला मोठं नुकसतान करतात, यावर बिहारचं भवितव्य ठरू शकतं.

निवडणुकीच्या अगदी थोडे दिवस आधी पक्ष संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. बिहारचे किंग मेकर ठरण्याची त्यांची इच्छा होती. पण मतदानोत्तर कल चाचणीत लोकजनशक्ती पक्षाला दिलेला कौल फारसा मोठा दिसत नाही.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 7, 2020, 6:38 PM IST

ताज्या बातम्या