मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मतं खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा', नितीश कुमार यांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

'मतं खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा', नितीश कुमार यांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

आता मुख्यमंत्रीपदाची सूत्र कुणाच्या हाती जाणार यावरून चर्चा रंगली आहे.

आता मुख्यमंत्रीपदाची सूत्र कुणाच्या हाती जाणार यावरून चर्चा रंगली आहे.

आता मुख्यमंत्रीपदाची सूत्र कुणाच्या हाती जाणार यावरून चर्चा रंगली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

पाटणा, 13 नोव्हेंबर : बिहारमध्ये भाजपसह NDAने बहुमत मिळवलं आणि काँग्रेससह महाविकास आघाडीला जोर का झटका दिला. आता मुख्यमंत्रीपदाची सूत्र कुणाच्या हाती जाणार यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्यावर आपली बाजू मांडली आहे. चिराग पासवान यांच्याबद्दल भाजप जो निर्णय घेईल तो योग्य असेल असा विश्वास देखील नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. मतं कापणाऱ्यांचं भविष्य भाजपने ठरवावनं असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपदाची सूत्र कुणाच्या हाती जाणार यावर देखील नितीश कुमार यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल याबाबत NDA निर्णय घेईल. मी त्यासाठी दावा केला नाही. NDA ची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल असंही नितीश कुमार यांनी माहिती दिली आहे.

चिराग यांच्या पक्षानं बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवल्यानं NDAला मोठा त्रास सहन करावा लागला. अस असलं तरीही NDA बहुमतानं बिहारमध्ये आलं आहे. त्यामुळे चिरागबाबत निर्णय देखील भाजपसह NDAनं घ्यावा असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

हे वाचा-India China Border : लडाख सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी No Man's Land महत्त्वाचा

महाआघाडीला 110 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यात राजदला सर्वाधिक 75 जागा, डाव्या पक्षांना 16 तर 70 जागा लढवून काँग्रेसला फक्त19 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर महाआघाडीचं सरकार आलं असतं असंही म्हटलं जात आहे.

First published:

Tags: Bihar, Bihar Election