आदर्श आचारसंहिता लागू... मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं की, बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयोगाच्या परिषदेतील प्रमुख मुद्दे.... - बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार - पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी होणार मतदान यामध्ये नक्षलग्रस्त मतदान केंद्राचा ही होणार समावेश. - दुसऱ्या टप्प्यात 94 मतदान केंद्रावर होणार मतदान उर्वरित मतदान केंद्रावर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार - तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर होणार मतदान. - बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. - सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपत लोकशाहीचा अधिकार वापरण्याची संधी देण्यात आली आहे - नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल - देशातील 8 राज्यातील राज्यसभेच्या 18 जागा यांची देखील निवडणूक घेतली जाणार आहे. -एका मतदान केंद्रावर ती हजार मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. - बिहारमध्ये 7.2 कोटी मतदार आहेत - बिहार राज्यात विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबर 2020 रोजी संपणार आहे. बिहार विधानसभेचे 243 सदस्य आहेत, त्यापैकी 38 जागा अनुसूचित जमातींसाठी आणि दोन एसटीसाठी राखीव आहेत. -सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत होणार मतदान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू लागू होणार नाही -प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे. -कोरोनाच्या काळात होणारी ही सर्वात मोठी निवडणूक आहे. -जवळपास एक लाख मतदान केंद्र असणार आहेत. -कोरोनामुळे सामाजिक अंतर करण्यात सक्तीचे करण्यात आले आहे. -मतदारांसाठी हात मोजे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. - नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल - एका मतदान केंद्रावर ती हजार मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. बिहार विधानसभेतील बलाबल (एकूण 243 जागा) एनडीए- 125 आरजेडी- 80 आयएनसी- 26 सीपीआय- 3 एचएएम- 1 एमआयएम- 1 आयएनडी- 5 रिक्त- 2 पक्षनिहाय बलाबल आरजेडी- 80 जेडीयू- 71 भाजप- 53 काँग्रेस- 27 LNJP- 2 RLSP-2 HAM-1 अपक्ष- 4#BiharElections2020 चुनावों में 6 लाख PPE किट का इंतज़ाम , कोरोना नियमों के तहत कराए जाएँगे चुनाव.#BiharElections #nitishkumar #JDU #RJD #TejashwiYadav #BJP #ElectionCommissionOfIndia pic.twitter.com/tbQHpcobR6
— News18 India (@News18India) September 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.