बिहार काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, पक्षाने बोलावली तातडीची बैठक

बिहार काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, पक्षाने बोलावली तातडीची बैठक

Tejashwi Yadav नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.

  • Share this:

पाटणा 12 नोव्हेंबर: बिहारमध्ये महाआघाडीची (Bihar Mahagathbandhan) सत्ता थोडक्यात हुकली आहे. त्यामुळे देशातला सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचं तेजस्वी यादव (Tejashwi Yadav)यांचं स्वप्न भंगलं आहे. आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला (Bihar Congress)हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी अजुनही आपल्याला सत्ता स्थापनेची आशा असल्याचा दावा केला आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरूवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी बोलताना तेजस्वी यादव यांनी हे संकेत देत आमदारांची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर दिल्लीतूनही काही नेते पाटण्यात दाखल झाले असून ते आमदारांची चर्चा करत आहेत.

महाआघाडीला 110 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यात राजदला सर्वाधिक 75 जागा, डाव्या पक्षांना 16 तर 70 जागा लढवून काँग्रेसला फक्त19 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर महाआघाडीचं सरकार आलं असतं असंही म्हटलं जात आहे.

तर काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पराभव स्वीकारून त्याची कारण शोधली पाहिजेत पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळेच बिहार महाआघाडीपासून वंचित राहिला असंही अन्वर यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या भाषणानंतर 24 तासांत भाजपच्या अध्यक्षावर हल्ला

नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. आमदारांनी महिनाभर पाटणा सोडून जाऊ नये. सरकार आपणच बनविणार आहोत असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. एनडीएमधल्या घटकपक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं तेजस्वी यादव यांना वाटतं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 12, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या