मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Navi Mumbai mass suicide: नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, आईसह मुलगा-मुलीचा मृत्यू

Navi Mumbai mass suicide: नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, आईसह मुलगा-मुलीचा मृत्यू

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने नवी मुंबई हादरली, संपूर्ण कुटुंबाने विष घेत संपवलं आयुष्य

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने नवी मुंबई हादरली, संपूर्ण कुटुंबाने विष घेत संपवलं आयुष्य

Navi Mumbai mass suicide: नवी मुंबईत संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी मुंबई, 31 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या (Family commits mass suicide in Vashi Navi Mumbai) केल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 85 वर्षीय मोहिनी कामवानी या आपल्या कुटुंबासोबत वाशी परिसरात राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगा दिलीप कामवानी (67 वर्षे) आणि मुलगी कांता कामवानी (61 वर्षे) हे सुद्धा राहत होते. या तिघांनी विष प्राशन करुन सामूहिक आत्महत्या केली. विष प्राशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, तिघांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, दिवाळीपूर्वी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. तिघांनीही दोन दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला. कर्नाटकात कुटुंबातील 5 जणांची सामूहिक आत्महत्या आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातून अशीच सामूहिक आत्महत्येची बातमी समोर आली होती. ब्लॅक फंगसमुळे (black fungus) पत्नीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या एका सेवा निवृत्त सैनिक आणि त्याच्या पाच मुलांनी आत्महत्या (Suicide) केली. ही धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील एका गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की,गोपाळ हदिमानी (46) आणि त्यांची चार मुलं सौम्या (19), श्वेता (16), साक्षी (11) आणि सृजन हदिमानी (8) यांनी शुक्रवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली. शेजारच्यांना सकाळी घरातील एकही सदस्य दिसला नाही, म्हणून त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्यावर मोठा आघात झाला होता. यासंबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, तो आणि त्याची मुलं वारंवार आईची आठवण काढत आणि तिच्याशिवाय जगू शकणार नसल्याचं म्हणत असतं. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Mumbai, Suicide

पुढील बातम्या