जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मूच्या मिलिट्री स्टेशनवर आढळलं ड्रोन; लष्कराच्या फायरिंगनंतर ड्रोन गायब

जम्मूच्या मिलिट्री स्टेशनवर आढळलं ड्रोन; लष्कराच्या फायरिंगनंतर ड्रोन गायब

जम्मूच्या मिलिट्री स्टेशनवर आढळलं ड्रोन; लष्कराच्या फायरिंगनंतर ड्रोन गायब

Jammu Drone Attack: जम्मूमधील एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मिलिट्री स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 28 जून: जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसलं आहे. काल जम्मूमधील एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मिलिट्री स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून सैन्य तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याच उघड झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक मिलिट्री स्टेशनवर रविवारी पहाटे तीन वाजता ड्रोन दिसला. भारतीय लष्कर अलर्टवर होतं. त्यामुळे ड्रोन दिसताच लष्काराकडून त्या ड्रोनवर 20 ते 25 राऊंडची फायरिंग केली. फायरिंग करताच ड्रोन गायब झालं. सध्या लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु असून या ड्रोनचाही शोध घेत आहेत. जम्मूत काल दोन ड्रोन हल्ले रविवारी जम्मूच्या (Jammu) सतवारी (Satvari) परिसरात एअऱफोर्स बेसवर (Air force base) दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. IED टाकण्यासाठी ड्रोनचा वापर केला असून यात दोन बॅरेक्सचं नुकसान झालं. पाच मिनिटात दोन स्फोट झालेत आहेत. यातला पहिला स्फोट रात्री 1:37 वाजता आणि दुसरा 1:42 वाजता झाला आहे. 5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. हेही वाचा-   सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना या शक्तीशाली स्फोटांमागे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) किंवा लष्करी-ए-तोयबा (Lashkar-e-Taiyaba) या संघटनांचा हात असण्याची शक्यता जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह (DGP Dilbag Singh) यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर राज्यभर हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला असून सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा (Security) वाढवण्यात आली आहे. ड्रोनच्या वापराने हल्ले झाल्याने चिंता ज्या भागात हे स्फोट घडवण्यात आले, त्याच भागात अनेक महत्त्वाची कार्यालयं आहेत. जम्मूचं मुख्य विमानतळदेखील याच भागात असून स्फोटानंतर परिसरात अस्थिरतेचं वातावरण आहे. एअरफोर्सच्या बेसवर झालेले हल्ले हे ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे यामागे जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ड्रोनचा वापर कसा झाला? काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हिज्बुल मुजाहिदीनच्या मदतीनं पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीनं काही ड्रोन आणल्याची कुणकुण सुरक्षा यंत्रणांना लागली होती. त्यावेळी 5 ते 6 किलो वजनाचा एक आयईडीदेखील पोलिसांनी जप्त केला होता. याच दरम्यान, ड्रोन बनवण्याचं सुट्टं साहित्य छुप्या मार्गाने जम्मू काश्मीर परिसरात आणून त्याचा वापर हा हल्ल्यासाठी केला असावा, असा संशय जम्मू काश्मीर पोलिसांना आहे. पोलीस सध्या त्या दिशेने तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात