मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाची लागण (Congress leader Rahul Gandhi tested positive for COVID) झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू असून रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाची लागण (Congress leader Rahul Gandhi tested positive for COVID) झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

'सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी,' असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच देशभरातील काँग्रेस काँग्रेसकर्ते आणि राहुल यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत ते कोरोनाला हरवून लवकर बाहेर पडावेत, अशा सदिच्छा व्यक्त दिल्या जात आहेत.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना कोरोनाने ग्रासलं आहे. राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एम्समध्ये हलवण्यात आलं आहे.

मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीविषयी आरोग्यमंत्र्यांकडून माहिती

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 88 वर्षीय डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 20, 2021, 3:41 PM IST

ताज्या बातम्या