मुंबई, 15 फेब्रुवारी : भारतात येत्या वर्षात भूकंप होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच कानपूरच्या प्रसिद्ध ज्योतिषी आणि टॅरो कार्ड रीडर नितीशा मल्होत्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, देशात भूकंप होण्याची शक्यता आहे, परंतु या संकटापासून वाचण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहे. नितीशा सांगतात, ‘खगोलशास्त्रीय योगामुळे देशात काही मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, ती भूकंपही असू शकते. पण पंतप्रधान मोदींच्या कुंडलीतील शुभयोग पाहता, या नैसर्गिक आपत्तीचा भारतापेक्षा शेजारील देशांना मोठा फटका बसेल.’ काय आहे भविष्य? नितीशा म्हणाल्या की, ‘मेघानी ज्योतिष शास्त्रानुसार एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असेल, तर पृथ्वी आपत्तीच्या 7 दिवस आधीपासून नैसर्गिक संकेत देण्यास सुरुवात करते. जोरदार वारे वाहणं, वाढतं तापमान, अवकाळी पाऊस, रेडिओ सिग्नल किंवा टीव्ही सिग्नल खराब होणं हे यामधील संकेत असतात. काहीतरी अनपेक्षित होणार आहे, असा इशारा निसर्ग यामधून देत असतो. या वर्षी देशात ज्या प्रकारचे योग बनत आहेत, ते मोठा भूकंप होऊ शकतो, याचे संकेत देणारे आहेत. तुर्कीनंतर आणखी एक देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, सलग दुसरे अस्मानी संकट म्हणून भारताला फारसा धोका नाही! नितीशा यांच्या म्हणण्यानुसार, ‘यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी मेष राशीमध्ये 4 ग्रहांचा योग, नवं कुंडलीत सूर्य आणि चंद्र पृथ्वी तत्वाच्या राशीत असणं व मे महिन्यात चंद्रग्रहण असल्यामुळे भूकंप किंवा वादळाची शक्यता आहे.’ मात्र, या आपत्तीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीतच उपाय दडलेला असल्याचा दावा नितीशा यांनी केलाय. ‘मोदींच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ आणि चंद्राचा लक्ष्मी योग लग्नस्थळी असणं, कुंभ राशीमध्ये गुरु असणं व मंगळाची महादशा दिसत आहे. ही सर्व ग्रहस्थिती मोदींची कुंडली प्रभावी बनवते व त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा फारसा परिणाम भारतात दिसणार नाही. मात्र, या आपत्तीमुळे शेजारच्या देशांमध्ये प्रचंड विध्वंस होऊ शकतो.’ असं त्यांनी सांगितलं आहे.
यापूर्वीची भविष्यवाणी ठरली होती खरी! विशेष म्हणजे या आधीही ज्योतिषी नितीशा यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटची मॅच असो, किंवा विविध राज्यांतील निवडणुकांबाबतची भाकीतं असो, अनेक वेळा त्यांनी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं आहे. त्यातच आता त्यांनी भारतात भूकंप येऊ शकतो, असे भविष्य वर्तवलं असलं तरी त्याचा फारसा भारताला फटका बसणार नाही, असेही स्पष्ट केलं आहे. अर्थात ज्योतिष हे एक शास्त्र असून त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.

)







