नवी दिल्ली, 17 मे : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय (CBI) कडून पी चिदंबरम (P Chidambaram) यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर छापेमारी सुरू आहे. मुंबई, दिल्ली आणि तमिळनाडूसह देशभरात एकूण 11 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (CBI raids on Karti Chidambaram house and properties in Mumbai, Chennai, Delhi)
2010 ते 2014 या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधीत ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. आज सकाळी सहा वाजताच सीबीआयच्या टीमकडून देशभरातील विविध ठिकाणी ही छापेमारी सुरू केली आहे.
Tamil Nadu | Police presence at Congress leader P Chidambaram's residence in Chennai as CBI searches multiple locations of his son Karti Chidambaram in connection with an ongoing case pic.twitter.com/LQIv9LdCHX
— ANI (@ANI) May 17, 2022
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीबआयकडून कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित चेन्नई, दिल्ली आणि मुंबईतील ठिकाणी एकाचवळी छापेमारी सुरू केली. देशभरात एकूण 11 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याचं वृत्त समोर येत आहे.
वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात
एअरसेल-मॅक्सिस डील आणि आयएनएक्स मीडियाला 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुरीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामध्ये देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्यावर या व्यवहारात पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणात सीबीआयकडून ही छापेमारी असल्याचं बोललं जात आहे.
हा परदेशी निधी पी. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री असताना मिळाला होता. त्याच प्रकरणात सीबीआयने 15 मे 2017 रोजी आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर नोंदवला होता.
INX मीडिया ग्रुपवर आरोप आहे की, 2007 मध्ये फॉरेन इव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी)च्या मंजुरीत विविध अनियमितता करत 305 कोटींचा निधी प्राप्त केला. या कंपनीला ज्यावेळी परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हा पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBI, P chidambaram, Raid