नवी दिल्ली 26 मार्च : तुम्हीदेखील विदेशातील स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांचे (Roads)चाहते असाल तर आता आपल्या देशातही असेच रस्ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी असा दावा केली आहे, की पुढील तीन वर्षात भारतातील रस्तेदेखील अमेरिका आणि युरोपीय देशांप्रमाणेच होणार आहेत. सीआयआयद्वारे आयोजित इंडिया इकनॉमिक कॉनक्लेव २०२१ मध्ये ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की मोदी सरकारचा यावेळचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भारतातील रस्ते अमेरिका (America) आणि इतर युरोपीय देशांसारखे होतील. गडकरी म्हणाले, की केंद्र सरकार रोज ३५ किलोमीटर रस्ता बनवत आहे. लवकरच दररोज ४० किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचं लक्ष्यही पूर्ण केलं जाईल. ते म्हणाले, की कोरोना महामारीनंतर टोल कलेक्शनमध्ये सरकारनं 10 हजार कोटींची वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुढील पाच वर्षात एक लाख कोटी रुपये जमवण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे पैसे शेयर बाजारात लावले जातील. त्यांनी इंडस्ट्रीजला याबाबत पुढे येऊन लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे काम अधिक गतीनं होईल तसंच या फंडचा उपयोग चांगल्या सुविधांसाठी होईल असंही ते म्हणाले. गडकरी पुढे म्हणाले, की एनएचआय पुढच्या पाच वर्षात टोल कलेक्शन ऑपरेशन आणि ट्रान्सफरअंतर्गत रस्त्यांना बाजारात उतरवत एक लाख कोटी जमा करण्याची योजना आहे. गडकरी म्हणाले, की संपत्ती बाजारात उतरवणं विक्री किंवा भाड्यानं देणं ही उद्योगांसाठी चांगली संधी आहे. सोबतच सरकारलाही ठराविक रक्कम मिळण्यासाठी आणि याचा कामात वापर करण्यासाठी मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.