मराठी बातम्या /बातम्या /देश /हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत नाहीतर.. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाल्या..

हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत नाहीतर.. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाल्या..

प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Pradnya Singh Thakur Controversial Statement : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karnataka, India

बंगळुरू, 26 डिसेंबर : देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज नुकतेच म्हणाले होते. यावरुन वाद सुरू असतानाच आता भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. "हिंदूंना त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे." असं वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कर्नाटकात रविवारी केलं. शिवमोग्गा, कर्नाटक येथे आयोजित हिंदू जागरण वैदिकच्या दक्षिण विभागीय वार्षिक परिषदेला खासदार उपस्थित होत्या. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काय म्हणाल्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर?

"हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवा. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी धारधार चाकू तरी ठेवा. काय परिस्थिती निर्माण होईल माहीत नाही. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे." असे आवाहन प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं.

वाचा - मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती

त्यांच्याकडे जिहादची परंपरा : ठाकूर

लव्ह जिहादवर ठाकूर म्हणाल्या, त्यांच्याकडे जिहादची परंपरा आहे, दुसरे काही नाही तर ते लव्ह जिहाद करतात. प्रेम असले तरी त्यातही ते जिहाद करतात. आपणही प्रेम करतो, देवावर प्रेम करतो, एक संन्यासी त्याच्या देवावर प्रेम करतो. संन्यासींच्या मते, जोपर्यंत सर्व अत्याचारी आणि पापी लोक काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत ईश्वराने निर्माण केलेल्या या जगात प्रेमाची खरी व्याख्या टिकू शकत नाही. खासदार प्रज्ञा सिंह सध्या कर्नाटकात आहेत.

त्यांनी आमच्या हिंदू वीरांना कापले : ठाकरे

खासदार म्हणाल्या, लव्ह जिहादमध्ये सामील असलेल्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या. तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवा, तुमच्या मुलींना शिक्षित करा. घरात शस्त्रे ठेवा, बाकी काही नसेल तर भाजी कापण्यासाठी चाकू धारदार ठेवा... मी स्पष्ट बोलतोय. त्याने आमच्या हर्षावर चाकूने वार केले. त्यांनी आमच्या हिंदू वीर, बजरंग दल, भाजप, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चाकूने छिन्नविछिन्न केले आहे. त्यामुळे भाजी कापण्यासाठी चाकूही धारदार ठेवावा. संधी कधी येईल माहीत नाही.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Hindu