भिंड, 12 मार्च : भिंड जिल्ह्यातल्या अटेर तालुक्यात नवली वृंदावन इथं एक मोठा ड्रोन कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. शनिवारी हे ड्रोन एका आश्रमाजवळ असलेल्या शेतात पडले होते. यानंतर आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ड्रोन ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अटेरच्या नवली वृंदावन इथं एका आश्रमावर दोन ड्रोनने फेऱ्या मारल्या. त्यानंतर ते ड्रोन अचानक आश्रमाजवळ असलेल्या शेतात कोसळलं. त्यावेळी आश्रमात असलेल्या निर्मलदास नागा महाराज यांनी हा प्रकार पाहिला. ड्रोन कोसळल्याची माहिती परिसरात समजताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर लोकांमध्ये हा बॉम्ब असल्याची अफवाही पसरली. अटेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ड्रोन ताब्यात घेतले. तसंच ड्रोन कुठून आले, ड्रोनच्या सहाय्याने कोण नजर ठेवून होते याचा तपासही सुरू केला गेला. घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली 250 चांदीची नाणी; खजिन्याच्या शोधासाठी प्रशासनाची शोध मोहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रोन केंद्रीय जल आयोगाचे असल्याचं समोर आलं आहे. अटेरचे उपनिरीक्षक देविंद्र राठोड यांनी सांगितलं की, केंद्रीय जल आयोगाकडून नदीवर धरण बांधण्यात येत आहे. त्याचे सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यासाठी हा ड्रोन वापरण्यात येत होता. पाचनदा नदीमार्गे अटेर चंबळपर्यंत सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. यावेळी ड्रोन क्रॅश होऊन गावात पडला. आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ड्रोन परत देण्यात आले आहेत. दरम्यान, ड्रोन कोसळण्याची ही भागातील पहिलीच घटना असल्यानं लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. दोन फूट लांब विमानाच्या मॉडेलसारखा हा ड्रोन तयार करण्यात आला होता. लोकांना हे आकाशात उडणारे विमान वाटले होते. मात्र खाली कोसळल्यानंतर लोक घाबरले होते. आता ते ड्रोन असल्याचं समजल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.