मराठी बातम्या /बातम्या /देश /“Bharatpe’चे अशनीर ग्रोव्हर मोठ्या सुट्टीवर, शिव्यांची क्लिप Viral झाल्यानंतर घेतला निर्णय

“Bharatpe’चे अशनीर ग्रोव्हर मोठ्या सुट्टीवर, शिव्यांची क्लिप Viral झाल्यानंतर घेतला निर्णय

शिव्या देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे वादग्रस्त ठरलेले भारतपे कंपनीची सहसंस्थापक आणि एमडी अशनीर ग्रोव्हर यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिव्या देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे वादग्रस्त ठरलेले भारतपे कंपनीची सहसंस्थापक आणि एमडी अशनीर ग्रोव्हर यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिव्या देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे वादग्रस्त ठरलेले भारतपे कंपनीची सहसंस्थापक आणि एमडी अशनीर ग्रोव्हर यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 19 जानेवारी: भारतपे (Bharatpe) या फिनटेक कंपनीचे (Fintech Company) सहसंस्थापक (Co founder) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी मार्च महिनाअखेरपर्यंत सुट्टीवर जाण्याचा (Long leave till March end) निर्णय घेतला आहे. कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्यासोबत (Kotak Group Employee) त्यांनी केलेल्या शिवीगाळीची क्लिप व्हायरल झाल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीनंही त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं असून हा निर्णय त्यांच्या आणि कंपनीच्याही हिताचा असल्याचं म्हटलं आहे. 

तीन महिन्यांची सुट्टी

अशीनर ग्रोव्हर यांनी आपण मार्च महिनाअखेरपर्यंत सुट्टी घेत असल्याचं जाहीर केलं आहे. कंपनी, गुंतवणूदार आणि कर्मचारी या सर्वांच्या हिताचा विचार करूनच आपण हा निर्णय़ घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सुहैल समीर यांच्याकडे या काळात व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वीच अशनीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी हे कोटक महिंद्राच्या एका कर्मचाऱ्यासोबत अश्लाघ्य भाषेत शिविगाळ करत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून जोरदार वादंगही झाला होता. Nykaa IPO च्या शेअरच्या अलॉटमेंटच्या मुद्द्यावरून हे संभाषण झालं होतं आणि त्यावेळी ग्रोव्हर यांनी कर्मचाऱ्याला अत्यंत अश्लील शिव्या दिल्या होत्या. 

हे वाचा -

2018 साली लॉन्च झाली भारतपे

2018 साली लॉन्च झालेल्या या कंपनीनं इंटरऑपरेटेबल क्यूआर कोडची निर्मिती केली. याचा वापर प्रत्येक ऑनलाईन व्यवहारांसाठी होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर अनेकांनी या कंपनीची सेवा घेतली आणि बघता बघता कंपनीनं मोठं यश मिळवलं. आज बाजारात प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी जे क्यूआर कोड वापरले जातात, त्यातील बहुतांश सेवा या भारतपे कंपनी देत असते. देशातील 150 हून अधिक शहरांमध्ये ही कंपनी कार्यरत असून जवळपास 75 लाख छोटेमोठे दुकानदार या क्यूआर कोडचा वापर करत आहेत. ही कंपनी दुकानदारांना कर्जही देते. आतापर्यंत कंपनीनं छोट्या दुकानदारांना 3000 कोटी रुपयांच्या कर्जांचं वाटप केलं आहे.

First published:

Tags: Money, QR code payment, Viral audio clip