• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Bharat Bandh: संयुक्त किसान मोर्चाची 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक, राजकीय पक्षांसह 100 संघटनांचा पाठिंबा

Bharat Bandh: संयुक्त किसान मोर्चाची 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक, राजकीय पक्षांसह 100 संघटनांचा पाठिंबा

Representative Image

Representative Image

अनेक शेतकरी संघटना, कामगार संघटना, कर्मचारी आणि विद्यार्थी संघटना, महिला संघटना, वाहतूकदार संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha - एसकेएम) 27 सप्टेंबर 2021 ला भारत बंद (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदमध्ये राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटना, तरुण, शिक्षक, मजूर आदींच्या जवळपास 100 संघटना सहभागी होणार आहेत. देशभरात भारत बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनांनी मोठी तयारी केली आहे. कृषी विधेयकांच्या विरोधात जवळजवळ 9 महिन्यांपासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांकडून (Farmers) आंदोलन केलं जात आहे. मात्र, केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बुधवारी 300 दिवस पूर्ण झाले. या निमित्तानं आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चानं एक निवेदन जारी केलं आहे. हे आंदोलन देशातील लाखो शेतकऱ्यांच्या इच्छा आणि बांधिलकीचा पुरावा असल्याचं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीयांकडे असणार युनिक हेल्थ आयडी, जाणून घ्या मोदी सरकारची काय आहे नवीन योजना अनेक शेतकरी संघटना, कामगार संघटना, कर्मचारी आणि विद्यार्थी संघटना, महिला संघटना, वाहतूकदार संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे. बंदमध्ये आयोजित रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावं यासाठी किसान महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय सायकल आणि मोटार सायकल रॅली देखील काढण्यात येणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने बुधवारी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्यांवर पुन्हा चर्चा सुरू करावी आणि तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करावेत, असं आवाहन या संघटनेने सरकारला केलं आहे. कमाल झाली; नॅशनल हायवेवरील खड्डे पाहून 'परम सुंदरीं'नी केला चक्क Ramp walk भारत बंदला डाव्या पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (CPI-M), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), फॉरवर्ड ब्लॉक आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP) यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात लोकांना भारत बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने 5 सप्टेंबर 2021 ला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचं आयोजन केलं होतं. या महापंचायतीत 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी शेतकरी संघटनेने 25 सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी मुझफ्फरनगरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र आले होते. या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
  First published: