जाहिरात
मराठी बातम्या / देश / Bharat Bandh : 12 hours भारत बंद! कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या हाकेला कसा मिळतोय प्रतिसाद?

Bharat Bandh : 12 hours भारत बंद! कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या हाकेला कसा मिळतोय प्रतिसाद?

Bharat Bandh : 12 hours भारत बंद! कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या हाकेला कसा मिळतोय प्रतिसाद?

शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी बारा तासांचा भारत बंद पुकारला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 मार्च : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी बारा तासांचा भारत बंद पुकारला आहे. मात्र, याचे तितके पडसाद उमटलेले दिसत नाहीत. दिल्लीतील प्रमुख व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे, या बंदचा बाजारांमध्ये अधिक परिणाम दिसलेला नाही. . मात्र, वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना याचा सामना करावा लागत आहे. संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. शेतकरी संघटनांनी अशी घोषणा केली, की मागील काही दिवसांमध्ये सुरू करण्यात आलेले रस्ते भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे NH-24 रस्त्यावरुन दिल्लीहून गाझियाबादकडे जाणाऱ्या रस्त्याचा उपयोग करता येणार नाही. गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवर आंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत तसंच किमान आधारभूत किमतीनं होणाऱ्या खरेदीबाबत कायदा बनवावा, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्वप्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत, वीज विधेयक, प्रदूषण विधेयक मागे घ्यावे, पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती कमी कराव्यात अशा मागण्या आजच्या भारत बंदमध्ये केल्या जात आहेत. मोर्चाचे नेता दर्शनपाल यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, की बंद दरम्यान भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा बंद ठेवला जाईल. मोर्चानं एका वक्तव्यात म्हटलं, की भारत बंदमध्ये सर्व दुकानं, मॉल, बाजार आणि संस्थानं बंद राहातील. सर्व लहान मोठ्या मार्गावरील वाहतूक थांबवली जाईल तसंच रेल्वेही रोकल्या जातील. रुग्णवाहिका आणि आवश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहिल. भारत बंदचा प्रभाव दिल्लीमध्येही दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात