बेंगळुरू, 22 फेब्रुवारी : बालविवाहाचा कायदा असला तरीही अजुन देशातील काही भागांमध्ये अल्पवयीनांचे विवाह होतात. बेंगळुरुत असा एक प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरुतील पुट्टेनाहल्ली ठाण्याच्या हद्दीत एका गावामध्ये 16 वर्षीय मुलगा आणि 19 वर्षाच्या मुलीचे लग्न लावण्यात आल्याची घटना घडली. यानंतर बालविवाहाची तक्रार दाखल झाल्यानंतर मुलाची रवानगी रिमांड होममध्ये झाली आहे.
पोलिसांनी विवाहीत दाम्पत्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध बाल विवाह कायद्या 2006 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुलाने शाळा अर्ध्यातच सोडली होती. आठवीपर्यंत शिकलेल्या मुलाने एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम सुरू केले. त्यातूनच त्याची ओळख एका 19 वर्षाच्या मुलीसोबत झाली.
मुलगी ज्या घरात काम करत होती तिथं सिलिंडर देण्यास गेल्यानंतर दोघांची ओळख वाढली. तसेच दोघेही नेपाळी असल्याने ते मित्र बनले आणि प्रेमातही पडले. एक महिन्यापूर्वी शहरात राहण्यास आलेली मुलगी तिच्या आई वडिलांचे घर सोडून मुलाच्या घरी राहण्यास पोहोचली. मुलीने तिच्या घरी सर्व सांगितलं आणि नेपाळ सोडलं.
दोघेही लग्नाशिवाय घरात राहत असल्याने आजुबाजुच्या लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 15 फेब्रुवारीला एका छोटेखानी समारंभात दोघांचे लग्न झाले. त्यानंतर काहीच दिवसांत कोणीतरी बाल विवाहाची तक्रार केली.
तक्रारीनंतर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये मुलाचे वय 16 आणि मुलीचे वय 19 असल्याचे समोर आलं आहे. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाची रवानगी रिमांड होममध्ये केली आहे.
वाचा : प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या, झोपेत उशीने दाबले तोंड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wedding