प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या, झोपेतच उशीने दाबले तोंड

प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या, झोपेतच उशीने दाबले तोंड

मुलीने आंतरजातीय प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

भुसावळ,22 फेब्रुवारी: मुलीने आंतरजातीय प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे ही घटना घडली आहे. आई-वडिलांनीच अल्पवयीन मुलगी झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून हत्या केली आहे. 19 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली असून दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलाशी प्रेमसंबंध असल्याने आई-वडिलांनी या मुलीची हत्या केली आहे.

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील घटना असून मुलीला गावातील एका तरुणाने आपल्या जाळ्यात ओढले होते. यावरून दीड वर्षापूर्वी आई-वडिलांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन पोलिसांत तक्रारही दिली होती. पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली होती. न्यायालयाने तरुणाला सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा तरुण आपल्या मुलीच्या मागे लागल्याने अखेर या मुलीच्या वडिलांनी आपल्या समाजातील दुसरा मुलगा पाहून त्या मुलीचा विवाह करण्याचे ठरवले होते. मात्र, मुलीचे वय साडे सतरा वर्षे असल्याने मुलीला जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाने याबाबत भुसावळ न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

लासलगाव जळीतकांड प्रकरण, पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अल्पवयीन मुलीचा विवाह याविरोधात न्यायालयाने संबंधित मुलीच्या वडिलांना नोटीसही पाठवली होती. आपल्या मुलीची व आपली बदनामी होईल, या कारणाने त्या मुलीच्या आईवडिलांनी 19 फेब्रुवारीच्या रात्री ही मुलगी गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून हत्या केली. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी झोपेतील मुलगी उठत नाही. झोपेत तिचा मृत्यू झाला, अशा आरोपी आई-वडिलांनी बनाव केला. मात्र याविषयी गावामध्ये कुजबुज सुरू झाल्याने तळवेल येथील पोलिस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांनी वरणगाव पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर मुलीचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शरीरावर काही संशयास्पद खुणा आढळल्या त्यावरून या मुलीचा मृतदेह जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात त्याकरता पाठवण्यात आला.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरून नवा ट्विस्ट, काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे

शवविच्छेदनाच्या अहवालात या मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आपणच मुलीचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. मुलीला जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाने न्यायालयात तक्रार दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होऊ नये, म्हणून मुलीला ठार मारण्याची यावी मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले.

First published: February 22, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या