Home /News /national /

West Bengal Election 2021: दक्षिण बंगाल ठरवणार भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचं भवितव्य

West Bengal Election 2021: दक्षिण बंगाल ठरवणार भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचं भवितव्य

West Bengal Election: केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी सह पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत; मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम बंगालमधील निवडणुकीकडे

    कोलकाता, 27 फेब्रुवारी: पाच राज्यांमधील विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं कालच जाहीर केल्या आहेत. केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी सह पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत; मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम बंगालमधील निवडणुकीकडं (West Bengal Election) कारण याठिकाणी तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात चांगलीच चुरस आहे. कॉंग्रेस (Congress) आणि डावे पक्ष (Left Parties) असले तरीही मुख्य लढत ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेले चार महिने इथं राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचं स्थान या निवडणुकीतील विजयानं बळकट व्हावं याकरता भाजपनं आपली पूर्ण ताकद इथं लावली आहे, तर तृणमूल कॉंग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं अत्यावश्यक आहे. या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील निर्विवाद वर्चस्वासाठी दक्षिण बंगालमधील (South Bengal) जागांवरील विजय निर्णायक ठरणार आहे. कारण विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 218 जागा दक्षिण बंगालमध्ये आहेत. (हे वाचा-शिवसेना पुन्हा अडचणीत; मुंबईतील महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप) दक्षिण बंगालमध्ये बीरभूम पूर्व, बीरभूम पश्चिम, हुगळी, हावडा पश्चिम आणि पूर्व, मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया, नादिया नॉर्थ आणि साउथ, 24 परगणा आणि कोलकाता या प्रदेशांचा समावेश आहे. या भागात मुस्लीम आणि हिंदी भाषिक हिंदूची संख्या अधिक आहे. या शिवाय मध्यमवर्गीय बंगाली लोकही इथं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं भाजपची या भागातील मतदारांवर विशेष लक्ष आहे. ममता यांना झटका गेल्या चार महिन्यात बंगालमधील राजकीय चित्र उलटसुलट झालं आहे. तृणमूल कॉंग्रेसचे तीन मंत्री आणि 14 महत्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला आहे, तर अनेक मंत्री अजूनही पक्ष सोडण्याची भाषा करत आहेत. परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी, राजीव बॅनर्जी, सोवन चटर्जी, सब्यासाची दत्ता, सुनील मंडल अशा बड्या नेत्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला आहे. (हे वाचा-'एक मार्च से दूध 100 रुपये लीटर' ट्विटरवर का ट्रेंड होतोय हा हॅशटॅग, जाणून घ्या) तृणमूलचे अस्तित्व ममतांमुळे तृणमूल कॉंग्रेसला खिंडार पडलं असलं तरीही ममता बॅनर्जी आहेत तोपर्यंत मतदार याच पक्षाला निवडून आणतील असा विश्वास तृणमूलच्या सदस्यांना आहे. ममता बॅनर्जी मतदारांच्या थेट संपर्कात असल्याचा दावा पक्षातर्फे केला जात आहे. ममता बॅनर्जी यंदा दक्षिण कोलकातातील भवानीपूर आणि नंदीग्राम अशा दोन ठिकाणांहून निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम, हुगळी आणि सिंगरूर यांचं बंगालच्या राजकारणात विशेष स्थान आहे. 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी याच भागात आंदोलन करत 34 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना उखडून टाकलं होतं. भाजपची प्रतिष्ठा पणाला पश्चिम बंगाल मधील या निवडणूकीत भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावली असून पक्षाचे दिग्गज नेते सतत पश्चिम बंगालचे दौरे करत आहेत. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दिलीप घोष, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, यांच्यासह कैलाश विजयवर्गीय आदी नेते विजयासाठी जीवतोड मेहनत करत आहेत; मात्र अद्याप भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा आपला उमेदवार घोषित केलेला नाही. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी सतत पश्चिम बंगालचे दौरे केले आहेत.
    First published:

    Tags: Amit Shah, India, Mamata banerjee, PM narendra modi, Trinamool congress, West bengal

    पुढील बातम्या