भोपाळ, 08 मार्च : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्यावर झालेल्या अंधश्रद्धेच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आता एका मुलाखतीत धीरेंद्र शास्त्री यांनी लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या. यात धीरेंद्र शास्त्रींना लहानपणी टीव्ही पाहणं खूप आवडायचं त्याचा एक किस्सा सांगितला. टीव्ही बघायला शेजारच्या घरी जायचे तेव्हा बराच वेळ तिथेच बसायचे. त्यावेळीच एक प्रसंग त्यांच्यासोबत घडला.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "9 ते 10 वर्षांचा असेन तेव्हा गावात एका घरी टीव्ही आला होता. ज्यांच्या घरी टीव्ही आला होता त्यांनी आम्हाला टीव्ही पाहू दिला नाही. दरवाजे बंद केले होते. मी काही बोललो नाही पण पळत घरी आलो.तेव्हा आईने लवकर का आलास असं विचारलं. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं. आईला काही सांगितलं नाही पण बाहेर जाऊन खूप रडलो होतो." टीव्हीचा हा किस्सा सांगताना बागेश्वर बाबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.
Surya Grahan 2023 : पुढील महिन्यात आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, वाचा कोणत्या राशींवर होणार परिणाम?
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी तेव्हा शपथ घेतली की टीव्ही स्वत: घेईन तेव्हा बघेन. मी दुसऱ्यांच्या घरी पौरोहित्य करण्यासाठी जायचो. तेव्हा ते थोडावेळ थांबा, टीव्ही पाहा म्हणायचे. मी सगळं करायचो पण टीव्ही बघत नव्हतो. टीव्ही असलेल्या ठिकाणी थांबणं मी टाळायचो.
पौरोहित्य करून दोन-दोन, पाच-पाच रुपये जमा करून वर्षभरात 3800 रुपयांचा ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही घेतला. तेव्हा माझं वय दहा एक वर्षांचं असेल. ज्यांनी आम्हाला पळवून लावलं त्यांचा टीव्ही खराब झाला. आम्ही टीव्ही घेतल्यावर लाडू आणले आणि पळवून लावलेल्यांना दिले. त्यांना धन्यवादही म्हटलं. कारण जर त्यांनी मला पळवून लावलं नसतं तर आमचा स्वत:चा टीव्ही आला नसता असंही बागेश्वर बाबांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News