आईला पाहताच तो रडू लागला, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना वाटतेय मृत्यूची भीती

आईला पाहताच तो रडू लागला, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना वाटतेय मृत्यूची भीती

आईला पाहताच मुकेशने रडायला सुरुवात केली आणि तो धाय मोकलू रडू लागला. आता फक्त आपले या जगात मोजकेच दिवस राहिले असल्याचं त्याच्या लक्षात आलंय.

  • Share this:

निर्भया 12 जानेवारी : देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीची तारीख आता निश्चित झालीय. सर्व चाराही आरोपींना डेथ वॉरंट बजावण्यात आलंय. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता सर्व आरोपींना फाशी होणार आहे. त्यामुळे सर्व आरोपींचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी तिहार कारागृहात येत आहेत. नियमांप्रमाणे आरोपींना नातेवाईकांशी आठवड्यातून दोन वेळा भेटण्याची परवानगी असते. फाशी आता अटळ आहे असं या आरोपींना कळलं आहे. तेव्हापासून त्यांचं वागणं बदललं असून ते सध्या कुणाशीही बोलत नाहीयेत. अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर या सर्व आरोपींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी दयेची याचिका, फेरविचार याचिका सादर केल्या होत्या. मात्र त्या फेटाळण्यात आल्या आहेत.

या आरोपींमधल्या मुकेश सिंह याला त्याच्या कुटुंबीयांना शनिवारी भेटायची परवानगी दिली होती. त्यावेळी त्याची आई मुकेशला भेटायला आली होती. त्यावेळी ते रडू लागला. या भेटीच्या वेळी त्याला अनेकदा रडू कोसळलं असं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. आईला पाहताच मुकेशने रडायला सुरुवात केली आणि तो धाय मोकलू रडू लागला. आता फक्त आपले या जगात मोजकेच दिवस राहिले असल्याचं त्याच्या लक्षात आलंय. पण हिंम्मत सोडू नका. सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिका आणि फेरविचार याचिका पुन्हा सादर करण्यात आली असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सांगितलं.

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस उप अधीक्षकच करत होता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत

दिल्लीतील पतियाळा कोर्टाने डेथ वारंट काढल्यानंतर दोन दोषींनी सुप्रीम कोर्ट क्यूरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता 14 जानेवारीला सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या दोषींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येईल, की त्यांना काही दिवस दिलासा मिळेल, हे 14 जानेवारी समजणार आहे.

VIDEO : क्षणात उद्ध्वस्त झालं घराचं स्वप्न, आणखी एक गगनचुंबी इमारत जमीनदोस्त

दोषी विनय शर्मा आणि मुकेश याने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. येत्या 14 जानेवारीला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एनव्ही रमणा, अरुण मिश्रा, आरएफ नरीमन, आर बनुमथी आणि अशोक भूषण यांच्या न्यायपीठात ही सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 03:17 PM IST

ताज्या बातम्या