नवी दिल्ली 29 जून: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत चिनी कंपन्यांना दणका दिला आहे. कोट्यवधी लोकांच्या फोन्समध्ये असलेल्या तब्बल 59 Appsवर बंदी घालण्यात आल्याने या कंपन्यांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देशातले अनेक तरुण Tik Tokच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असून ते सेलिब्रिटीही झाले आहेत. आता या Appवरचं बंदी घातल्याने या स्टार्सचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. (Government of India bans 59 mobile apps)
Tik Tok अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याने ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं आहे. मेट्रो शहरांमध्ये तर Tik Tok सेलिब्रिटीज तयार झाले आहेत. यात फक्त मनोरंजन करणारे VIDEO तयार होत नसून अनेक तरुण माहिती देणारे आणि शैक्षणिक VIDEO सुद्ध तयार करत आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन, अशा अनेक विभागांमध्ये दररोज शेकडो व्हीडीओ तयार होत असतात.
अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकांचे तर 60 ते 70 लाखांपर्यंत फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
List of 59 apps banned by Government of India "which are prejudicial to sovereignty and integrity of India, defence of India, security of state and public order”. pic.twitter.com/p6T2Tcd5rI
देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्या या Appsच्या माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे.
संपादन - अजय कौटिकवार
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.