नवी दिल्ली, 29 जानेवारी: नवी दिल्लीतील विजय चौकात आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर राम नाथ कोविंद(Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) आज संध्याकाळी होणाऱ्या बीटिंग रिट्रीट (Beating Retreat 2022) सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची औपचारिक समाप्ती म्हणून मानला जाईल. विशेष म्हणजे, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बिटिंग रिट्रिट समारंभात लेजर शोचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी 1000 मेड इन इंडिया ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी होणाऱ्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यात सुमारे 1,000 स्वदेशी बनावटीचे ड्रोन लाइट शोचा भाग असतील. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, या मानवरहित हवाई उपकरणांसह एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करणारा भारत हा चीन, रशिया आणि ब्रिटननंतरचा चौथा देश ठरेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेला 10 मिनिटांचा ड्रोन शो, स्टार्टअप बोटलॅब डायनॅमिक्सद्वारे आयोजित केला जात आहे
भारतीय स्टार्टअप बोटलॅब, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (TDB) द्वारे अर्थसहाय्यित आणि IIT दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली, लाइट शो मार्किंगचा एक भाग म्हणून आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीट समारंभात 1,000 ड्रोन उड्डाण करतील.
यासह आज प्रजासत्ताक दिन सप्ताहाची सांगता होणार आहे. या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव) बीटिंग रिट्रीट सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत विजय चौक येथे लेजर शो आणि ड्रोनचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. तसेच, बिटिंग रिट्रिट समारंभात 1950 पासून वाजवण्यात येणारी अबाईड विथ मी ही धून यंदा वाजवली जाणार नाहीये. ‘अबाईड विथ मी’ऐवजी कवी प्रदीप यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ची धून वाजवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.