मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्ली कोर्टाचा निर्णय

मोठी बातमी! दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्ली कोर्टाचा निर्णय

Batla House Encounter Case : दिल्ली न्यायालयाने पोलीस इन्स्पेक्टर मोहम चंद शर्मा यांची हत्या आणि 2008 बाटला हाऊस प्रकरणाशी संबंधित दोषी आरिज खान याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
Batla House Encounter Case : दिल्ली न्यायालयाने पोलीस इन्स्पेक्टर मोहम चंद शर्मा यांची हत्या आणि 2008 बाटला हाऊस प्रकरणाशी संबंधित दोषी आरिज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. साकेट कोर्टाने ही अत्यंत दुर्मीळ केस असल्याचं सांगितलं. (Batla House Encounter Case Terrorist Arij Khan sentenced to death) पोलिसांनी दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’ शी कथित स्वरुपात जोडलेल्या आरिज खान याला मृत्यूची शिक्षा देण्याची मागणी केली होती.  पोलीस याबाबत म्हणाले की, हे केवळ हत्याचं प्रकरण नाही तर न्यायाचं संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हत्याचं प्रकरण आहे. आरिज खानच्या वकिलांनी मृत्युदंडाचा विरोध केला.  यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव सायंकाळसाठी निर्णय सुरक्षित ठेवला होता. न्यायालयाने 2008 मध्ये बाटला हाउस चकमकीदरम्यान दिल्ली पोलिसांचं विशेष कक्षाचे निरीक्षक अधिकारी शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. आणि इतर गुन्ह्यांसाठी आरिज खानला 8 मार्च रोजी दोषी ठरविण्यात आलं होतं. न्यायालयाने सांगितलं होतं की, आरिज खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळी चालवून त्याची हत्या केली, असं सिद्ध होत आहे. हे ही वाचा-शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात 2008 मध्ये बाटला हाऊल चकमकीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे निरीक्षत शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित 2013 च्या जुलैमध्ये न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी शहजाद अहमद याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध अहमद यांची अपील हायकोर्टात प्रलंबित आहे. आरिज खान घटनास्थळाहून पळून गेला होता आणि त्याला फरारी घोषित करण्यात आलं होतं. खान याला 14 फेब्रुवारी 2018 रोजी पकडण्यात आलं आणि तेव्हा त्याच्यावर खटला सुरू होता.  
First published:

Tags: Delhi, Terrorist

पुढील बातम्या