मराठी बातम्या /बातम्या /देश /बांगड्या विकणाऱ्या तरुणाच्या मारहाणीनंतर वाद पेटला, काँग्रेस नेत्याने शेअर केला VIDEO

बांगड्या विकणाऱ्या तरुणाच्या मारहाणीनंतर वाद पेटला, काँग्रेस नेत्याने शेअर केला VIDEO

बांगड्या विकण्याचं कारण पुढे करत, महिलांची छेड काढल्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसने आता मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

बांगड्या विकण्याचं कारण पुढे करत, महिलांची छेड काढल्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसने आता मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

बांगड्या विकण्याचं कारण पुढे करत, महिलांची छेड काढल्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसने आता मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

    नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका व्यक्तीला जमावाने मारहाण (MP Bangle seller beaten up) केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bangle seller beaten video) होतो आहे. बांगड्या विकणाऱ्या एका व्यक्तीला काही लोक शिवीगाळ (Bangle seller abused) करत जबर मारहाण करत (MP Muslim man beaten) आहेत. यासोबतच, या लोकांनी त्या व्यक्तीकडील सामानही रस्त्यावर फेकून दिलं असल्याचं व्हिडीओत दिसतंय. बांगड्या विकण्याचं कारण पुढे करत, महिलांची छेड काढल्याचा आरोप (Bangle seller beaten for molestation) या व्यक्तीवर करण्यात आला आहे. तसंच, हल्लेखोरांनी या व्यक्तीकडील पैसेही लुटल्याचं समजत आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसने आता मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

    उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांनी या व्हिडीओवरुन, एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (MP CM Shivraj Singh Chauhan) यांच्यावर टीका केली आहे. इम्रान हे काँग्रेसच्या मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी या व्हिडीओतील हल्लेखोरांना दहशतवादी म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या घटनेचा जाब (Imran Pratapgarhi tweet) विचारला आहे. 'हा व्हिडीओ अफगाणिस्तानातील नसून, इंदौरमधील आहे. शिवराज चौहान यांच्या मध्यप्रदेशमध्ये एका बांगडी विक्रेत्या मुस्लिम व्यक्तीचं लिंचिंग (Muslim man lynched in MP) करण्यात येत आहे. तसंच, त्याच्याकडील सामानही लुटलं जात आहे. नरेंद्र मोदीजी, तुम्हाला अशा प्रकारचा भारत बनवायचा होता का? या दहशतवाद्यांवर कधी कारवाई होणार?' अशा आशयाचं ट्विट इम्रान यांनी केलं.

    कॉलेजमध्ये मोकळे केस ठेवण्यास बंदी, विद्यार्थिनी म्हणाल्या, हा तर तालिबानी कायदा

    यासोबतच, इम्रान (Imran Pratapgarhi on bangle seller video) यांनी या तरुणाला आपण आर्थिक आणि कायदेशीर मदत करणार असल्याचंही म्हटलं आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते म्हणाले, की 'इंदौरच्या या पीडित तरुणाशी (Muslim Bangle seller beaten) मी फोनवर बोललो. त्याच्याकडील सामानाचं जे काही नुकसान झालं आहे, तेवढ्याची भरपाई मी माझ्या खिशातून करत आहे. यासोबतच कायदेशीर कारवाईसाठी मी त्याला वकीलही उपलब्ध करुन देणार आहे. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आमची टीम तिथे पीडित (MP Muslim man beaten in Hindu area) तरुणासोबत आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    'लेडी तालिबान पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या'; भाजप नेत्याची ममता बॅनर्जींवर जहरी टीका

    दरम्यान, पोलिसांनी मात्र हे प्रकरण दाबल्याचा आरोप फेटाळला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, व्हिडीओच्या माध्यमातून हल्लेखोरांना ओळखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

    First published: