चिनी अॅप्सवरील बंदीनंतर नितीन गडकरींचा चीनला झटका; केली मोठी घोषणा

चिनी अॅप्सवरील बंदीनंतर नितीन गडकरींचा चीनला झटका; केली मोठी घोषणा

चीनच्या 59 मोबाइल अॅप्सवर बंदी आणल्यानंतर गडकरींनी मोठी घोषणा केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जुलै : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister of Road Transport & Highways, Micro, Small & Medium Enterprises)  यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

ते म्हणाले की, भारतातील हायवे प्रकल्पात चीनमधील कंपनी सहभागी होऊ शकणार नाहीत. जर ते कोणत्या भारतीय किंवा अन्य कंपनीसह जॉईंट वेंचर करीत बोली लावत असेल तर त्यांनाही सहभागी करुन घेण्यात येणार नाही. सरकार चिनी गुंतवणूकदारांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMES) अशा विविध क्षेत्रातही चिनी गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्यास रोखले जाईल हे सरकार सुनिश्चित करेल, असेही गडकरी म्हणाले.

हे वाचा-दहशतवाद्यांचा हल्ला अन् आजोबांच्या मृतदेहापाशी बसून रडत होतं 3 वर्षांचं चिमुरडं

चिनी कंपन्यांवरील बंदी - नितीन गडकरी यांनी पीटीआयला सांगितले आहे की आम्ही रस्ता बांधणीसाठी चिनी भागीदारांसमवेत संयुक्त प्रकल्पांना परवानगी देणार नाही. आम्ही ठाम भूमिका घेतली आहे की जर ते चिनी कंपन्या संयुक्त उद्यमाद्वारे आल्यास आम्ही यास परवानगी देणार नाही. लवकरच नवे धोरण येईल, असेही गडकरी म्हणाले. ज्यामध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घालणे आणि महामार्ग प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांना शिथिल करण्याचे नियम ठरवले जातील.

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पाचे काय होईल - सद्य: स्थितीत काही काळापूर्वी काही चिनी कंपन्यांचा समावेश होता. हा निर्णय नव्या प्रकल्पांना लागू होईल, असे गडकरी म्हणाले.

हे वाचा-दोन्ही देशांमध्ये तिसरी मोठी बैठक, गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास चीन तयार पण...

नवीन निविदात या क्षेत्रातील भारतीय क्षमता वाढविण्यावर आणि देशी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल. त्यानुसार नवीन निविदा देण्यात येईल. यातून मेक इन इंडियाच्या मोहिमेस प्रोत्साहन देण्याची योजना आहे. अशा परिस्थितीत या नव्या निविदेत अपग्रेडेशनसाठी उपकरणे पुरवणाऱ्या चिनी कंपन्यांना या यादीतून वगळण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: July 1, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading