धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या

धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या

सुशांतच्या आत्महत्येनंतर ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही महिला क्रिकेटपटूदेखील नैराश्यात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : भारतीय अंडर 19 क्रिकेटपटू अयंती रींग हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्रिपुराच्या अंडर 19 महिला संघातील 16 वर्षीय खेळाडू अयंतीचा मृतदेह मंगळवारी रात्री तिच्या खोलीच्या गच्चीवर लटकलेला आढळला. तिच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही. अयंती चार भावंडांमध्ये सर्वात लहान होती.

गेल्या एका वर्षापासून ती त्रिपुराच्या अंडर 19 संघात सहभागी झाली होती. इतकेच नाही तर राज्याच्या वतीने अंडर 23 वयोगटात टी -20 स्पर्धादेखील खेळली होती. ती राज्याची राजधानी अगरतलापासून साधारण 90 किमी लांब रींग भागातील होती. अयंतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तैमिर चंदा यांनी पीटीआयला सांगितले की, राज्यात भविष्यातील एक चांगला खेळाडू गमावला आहे. वयाच्या 16 व्या वर्षापूर्वीपासून ती राज्यातील संघाची सदस्य होती. ती खूप चांगली खेळाडू होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. जेव्हा त्यांना नैराश्याबद्दल आणि मानसिक परिस्थितीबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, गेल्या हंगामात ती ठीक दिसत होती, मात्र नंतर लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद होतं. आम्ही काही ऑनलाईन वर्ग आयोजित केले होते, परंतु आम्हाला त्याच्या कुटुंबाबाबत फार माहिती नव्हती.

अयंतीच्या मृत्यूची कारणे समोर आली नसली, मात्र नैराश्यातून तिने असे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. हल्ली नैराश्य हा एक मोठा मुद्दा झाला आहे. विशेषत: लॉकडाऊन दरम्यान मित्रांकडून वाढत्या अंतरामुळे काही लोकांवर मानसिक दबाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही घरात लटकून आपले जीवन संपवले होते. असेही म्हटले जात आहे की तो देखील बर्‍याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता.

हे वाचा-सुरज पंचोली-सुशांत सिंह राजपूत यांच्यात होता वाद? वाचा काय आहे सत्य

 

First published: June 17, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading