छतरपूर, 24 जानेवारी : जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री म्हणाले की, ते सनातन धर्माचे अनुयायी आहेत. सनातन धर्माचे अनुयायी अशा धमक्यांना घाबरत नाहीत. चमत्कारावरुन वादात सापडलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहिल्यांदाच बागेश्वर धाम येथे पोहचले. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी पाकिस्तानबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, जो देश इतरांना नष्ट करण्यात आपली शक्ती खर्च करतो तो देश नष्ट होतो. पाकिस्तानचे भारतात लवकरच विलीनीकरण झाले पाहिजे, त्यांच्याकडे हाच मार्ग शिल्लक आहे.
बागेश्वर धामच्या वादानंतर छतरपूरला परतलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी फोनवरून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारतात सनातन धर्माची जेव्हा-जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवला जातो. पण त्याला घाबरू नका. आमची आमच्या देव बागेश्वर हनुमानजीवर श्रद्धा आहे. बागेश्वर महाराज म्हणाले की, भारताचे नागरिक म्हणून आपला मध्य प्रदेश सरकार आणि भारत सरकारवर विश्वास आहे. अशा गोष्टी होत असतात.
तर भारत हिंदू राष्ट्र होईल : धीरेंद्र शास्त्री
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राविषयी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, 'सर्व सनातनी एकत्र असतील, तर भारत हिंदू राष्ट्र होईल, त्यात गैर काय? अनेक इस्लामिक देश आहेत, ख्रिश्चन देश आहेत, तर हिंदूंसाठी हिंदू राष्ट्र नसावे का? ही मागणी करणे बेकायदेशीर आहे का?'
वाचा - Bageshwar Maharaj : कोण आहेत बागेश्वर महाराज? धीरूचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री कसे झाले?
बागेश्वर सरकारला फोनवरुन जीवे मारण्याची धमकी
याआधी बागेश्वर धामच्या महाराजांना फोनवरून धमक्या दिल्याची बातमी आली होती. याबाबत छतरपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. धमक्यांची तक्रार धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणी बामिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.
अमर सिंह नावाच्या व्यक्तीने अज्ञात क्रमांकावरून बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्यक्ती सातत्याने धीरेंद्र शास्त्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, मात्र ती बोलू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Religion