Home /News /national /

मोदींनी मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर बाबुल सुप्रियोचा राजकीय संन्यास; खासदारकीचा राजीनामा

मोदींनी मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर बाबुल सुप्रियोचा राजकीय संन्यास; खासदारकीचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिपदावरून नुकतेच पायउतार झाल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी अखेर खासदारकीचाच राजीनामा दिला.

    कोलकाता, 31 जुलै : केंद्रीय मंत्रिपदावरून (union minister) नुकतेच पायउतार झालेले भाजप खासदार आणि गायक बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) सध्या नाराज असून ते राजकारणातून संन्यास (Political exit) घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू होती. त्यावर त्यांनीच आज शिक्कामोर्तब केलं. थेट खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. भावनिक Facebook Post लिहित त्यांनी राजकारणालाच अलविदा केलं. बाबुल सुप्रियो अवघ्या 6 वर्षांपूर्वी ज्या नाट्यमय पद्धतीने राजकारणात आले आणि बघता बघता केंद्रीय मंत्री झाले, त्याच वेगानं ते राजकीय प्रवाहातून बाहेर पडू शकतात, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतंच. त्याप्रमाणे बाबुल यांनी एक भावनिक पोस्ट बंगालीमध्ये लिहीत आपण हे क्षेत्रच सोडत असल्याचं म्हटलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर बाबुल सुप्रियो यांचा सार्वजनिक वावर कमी झाला होता. बंगालमध्ये कलगीतुरा पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि बाबुल सुप्रियो यांच्यात मतभेद असून त्यांचं एकमेकांशी बिलकूल पटत नसल्याचं चित्र आहे. मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश अनेक मुद्द्यांवरून त्यांचे वाद झाले असून दोघंही एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र होतं. ‘तृणमूल’ला होती प्रतीक्षा बाबुल सुप्रियो यांच्यासारखा केंद्रीय मंत्री राहिलेला नेता आपल्या पक्षात यावा, यासाठी तृणमूल काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू होते. सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Narendra modi, Union cabinet, West bengal

    पुढील बातम्या