काठमांडू, 9 जून : कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी देशातील विविध भागातून प्रयत्न केले जात आहे. यातच योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती केली आहे. कोरोना विषाणूवर हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. असे असले तरी देशात याच्या वापराला मान्यता देण्यात आलेली नाही. यानंतर शेजारील देश नेपाळ आणि भूतान येथेही कोरोनिल पाठविण्यात आलं आहे.
असं असलं तरी नेपाळने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाबा रामदेव यांना मोठा धक्का बसला आहे.
कोरोनिल औषध कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा ठोस पुरावा नसल्याचं नेपाळने म्हटलं आहे. ( After Bhutan coronil distribution is banned in Nepal as well)
हे ही वाचा-खासगी रुग्णालयात Corona vaccine घेणार आहात; इथं पाहा कोरोना लशीचे नवे दर
कोरोनिलचे 1500 किट मोफत पाठवले
कोरोनिलच्या 1500 किट खरेदी प्रकरण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसून त्यामुळे कोरोनिलचे वितरण तत्काळ थांबविण्यात आले. बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे 1500 किट मोफत पाठवले होते. मात्र नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, कोरोनिल किटमधील औषध कोरोनाची लढण्यास प्रभावी नाही.
या आधील भूतान औषध नियामक प्राधिकरणाने औषधाच्या वितरणावर बंदी घातली आहे. दुसरीकडे नेपाळच्या आरोग्यमंत्र्यांनीही कोरोनिल किटला घरचा रस्ता दाखवला.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.