नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आज देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee death anniversary) यांची दुसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली. अटलबिहारी वाजपेयींचा प्रवास सर्वांना माहित असला तरी, एकेकाळी उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना मदत केली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मुलाखतीत त्यांच्या संपत्तीबद्दल बोलताना म्हटले की, 1987 मध्ये किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्याइतपही पैसे नव्हते. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेव्हा वाजपेयी यांची मदत केली होती. राजीव गांधींनी केलेली मदत वाजपेयी विसरले नाहीत. त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये त्यांचे याबद्दल आभारही मानले होते. एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण मालमत्ता 14.05 कोटी एवढी होती. मात्र 2004 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाजपेयी यांची एकूण संपत्ती 50 लाख रुपयांच्या आसपास होती. वाचा- …आणि तेव्हा अटलजींसाठी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झापलं काय आहे 2004चं प्रतिज्ञापत्र? अटल बिहारी वाजपेयी 2004मध्ये लखनऊ येथून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. यादरम्यान, त्यांनी संपत्तीशी निगडीत जो हलफनामा निवडणूक आयोगाला दिला होता. या हलफनाम्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही 58 लाखांच्या आसपास होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकमध्ये दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये 20 हजार रुपये तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये 3 लाख 82 हजार 886 रुपये 42 पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या अजून एका अकाऊंटमध्ये 25 लाख 75 हजार 562 रुपये 50 पैसे एवढी रक्कम होती. त्यांच्याकडे 1 लाख 20 हजार 782 रुपयांचे 2400 युनिट बॉण्डही होते. हे यूनिट यूटीआय-1991 आणि 1993 च्या नॅशनल सेव्हिंग योजनेअंतर्गत देण्यात आले होते. तसंच वाजपेयी यांच्याकडे 22 लाख रुपये एवढी किंमत असलेलं एक घर दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाश येथे होते. तसेच ग्वालियरमधील त्यांच्या मूळ घराची किंमत 6 लाख रुपयांपर्यंत होती. वाजपेयी यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूरमधून राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले होते. वाचा- 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यपाल किल्ले शिवनेरीवर, पायी चालत करणार गडाची पाहणी वर्तमानात किती होती संपत्ती? वर्तमानात त्यांच्याकडे किती संपत्ती होती याबद्दल कोणालाही फारसे माहित नाही. पण www.celebritynetworth.com या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वाजपेयी यांच्याकडे सर्वसामान्यपणे 14.05 कोटी रुपये एवढी संपत्ती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.