

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि अभिनेता दिलीप कुमार यांच्यातील संबंध खूप चांगले होते आणि ते अनेकदा आपण सगळ्यांनी पाहिलेत. अनेक प्रसंगी त्यांच्यातील मैत्री दिसली होती


पाकिस्तानच्या कारगिल घुसखोरांदरम्यान, एक अशी वेळ आली की जेव्हा वाजपेयींसाठी दिलीप कुमार यांनी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ धमकावलं होतं.


1999मध्ये लाहोरमधील घोषणा पत्रामुळे अशी अपेक्षा होती की पाकिस्तान आणि भारत या 2 देशांमधील संबंध अनुकूल होऊ शकतात.


या करारामध्ये दोन्ही देशांनी शिमला कराराच्या अंमलबजावणीसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. वाजपेयी यांच्या भेटीदरम्यान, पाकिस्तानातील अनेक मूलभूत गटांनी मीनार-ए-पाकिस्तानच्या व्यासपीठावर आक्षेप घेतला आणि म्हटले की शत्रु देशांतील दुश्मनाचं पाऊल आपल्या देशात पडलं आहे.


कारगिल घुसखोरीवरुन नाराज अटलजींनी दिलीप कुमार यांच्याकडे नवाझ यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नवाझ यांच्याशी दिलीप कुमार यांनी बातचीत केली होती.