मराठी बातम्या /बातम्या /देश /Breaking News: नक्षलवादी- CRPF मध्ये चकमक, सहायक कमांडंट शहीद

Breaking News: नक्षलवादी- CRPF मध्ये चकमक, सहायक कमांडंट शहीद

Breaking News: एक मोठी बातमी (big news) समोर येत आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर जिल्ह्यात (Bijapur district) CRPF आणि (CRPF and Naxalites) नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

Breaking News: एक मोठी बातमी (big news) समोर येत आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर जिल्ह्यात (Bijapur district) CRPF आणि (CRPF and Naxalites) नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

Breaking News: एक मोठी बातमी (big news) समोर येत आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर जिल्ह्यात (Bijapur district) CRPF आणि (CRPF and Naxalites) नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

छत्तीसगड, 12 फेब्रुवारी: एक मोठी बातमी (big news) समोर येत आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर जिल्ह्यात (Bijapur district) CRPF आणि (CRPF and Naxalites) नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत CRPF जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येत आहे. CRPF अधिकाऱ्यानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. उसूर ब्लॉकच्या पुटकेल जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाल्याचं समजतंय.

दरम्यान सीआरपीएफ 168 बटालियन आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चकमकीत सहायक कमांडंट एस बी तिर्की हेही शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. विजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सर्वाधिक हिंसाचार

संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये सर्वाधिक 255 नक्षल हिंसाचाराच्या घटना घडल्या. यादरम्यान 101 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी झारखंडमध्ये 130 नक्षलवादी हल्ले झाले ज्यात 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

गेल्या वर्षी नक्षलवादी हिंसाचाराच्या एकूण 509 घटना घडल्या, ज्यामध्ये 147 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, 2020 मध्ये 665 घटना आणि 183 लोकांचा मृत्यू झाला आणि 670 हिंसक घटना आणि 2019 मध्ये 202 लोकांचा मृत्यू झाला.

नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 77% घट

या आठवड्यात, केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, देशात डाव्या विचारसरणीशी संबंधित हिंसाचार किंवा नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 77 टक्के घट झाली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खासदार जगदंबिका पाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, 2009 मध्ये झालेल्या सर्वाधिक 2258 हिंसक घटनांच्या तुलनेत 2021 मध्ये 509 घटनांची नोंद झाली आहे. खासदार जगदंबिका पाल यांनी लोकसभेत लेखी प्रश्न विचारला होता की, लॉकडाऊन दरम्यान देशात नक्षलवादी आणि खलिस्तानी कारवायांमध्ये वाढ झाली आहे की कमी झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Chhattisgarh, CRPF, Death, India, Naxal Attack