
वादळी पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे (Landslide in Assam) आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावांतून दळणवळण पूर्णपणे बंद आहे. हाफलाँगकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वे मार्ग 15 मेपासून बंद आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरांग, दक्षिण बगेतार, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बगेतार, झिओन आणि लोदी पांगमौल गावे अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झाली आहेत.

आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते आणि पुलांचं नुकसान झालं आहे. पिके नष्ट झाली आहेत. अनेक नद्यांची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर पोहोचली आहे.

राज्याच्या इतर भागांशी रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यामुळे सामान्य जनजीवन विसकळीत झालं आहे. रेल्वे रूळ पाण्यात बुडाले आहेत. काही ठिकाणी पुलावरून जाणाऱ्या रुळांच्या खालची भर खचल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद ठेवली आहे.

पुरामुळे अनेक गाड्या मधोमध अडकल्या होत्या. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागली. मदत आणि बचावकार्यात लष्करही तैनात करण्यात आलं आहे.

पुरामुळे अनेक गाड्या रस्त्यातच अडकल्या होत्या. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागली. मदत आणि बचावकार्यात लष्करही तैनात करण्यात आलं आहे.




