Lockdownवर उतारा, अखेर या राज्यात दारुची दुकाने सुरू होणार

Lockdownवर उतारा, अखेर या राज्यात दारुची दुकाने सुरू होणार

सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी अशी अट सरकारने घातली आहे.

  • Share this:

गुवाहाटी 12 एप्रिल : Lockdownच्य काळात सगळ्या जास्त त्रस्त झालेत ते दररोज दारु पिण्याची सवय असलेले लोक. दारुची दुकाने बंद असल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे देशभर या काळात अनेक दारुची बंद दुकाने चोरट्यांनी फोडली. तर अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तर केरळमध्ये काही जणांनी आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या. तर अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं लागलं. दारुमुळे सरकारच्या तिजोरीत मोठा करही जमा होतो. त्यामुळे आसाम सरकारने अखेर दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आसाममध्ये 13 एप्रिलपासून दारुची किरकोळ विक्रिची दुकाने सुरू होतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या तळीरामांना आता आसाम सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर कोरोना आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारच्या तिजोरीत दोन पैसे जमा होणार आहेत.

देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव झपाट्याने वाढत असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा (Covid - 19) फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमधील लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

हल्लेखोरांनी कापला पोलिसाचा हात, डॉक्टरांनी साडेसात तास शस्त्रक्रिया करून जोडला

मीडिया रिपोर्टनुसार भारतात अवघ्या 4 दिवसात 80 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे. यापूर्वी 8 एप्रिलपर्यंत 284 जिल्ह्यांमधील संसर्गाची प्रकरण समोर आली होती. आता त्यात वाढ झाली असून ही संख्या 364 पर्यंत पोहोचली आहे.

आज दिल्लीत (Delhi) 85 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसर आता दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1154 पर्यंत पोहोचला आहे आणि मृतांची संख्या 24 पर्यंत पोहोचली आहे.

भारताचा दणका, कारवाईत पाकिस्तानच्या 15 सैनिक आणि 8 दहशतवाद्यांचा खात्मा

दुसरीकडे मुंबईत (Mumbai) 217 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आतापर्यंत येथे 1399 कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला असून मृतांची संख्या 97 इतकी आहे. तर आतापर्यंत 97 जणं बरे होऊन घरी गेले आहेत.

गुजरातमध्ये (Gujrat) आज 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये (Bihar) आतापर्यंत 64 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

First published: April 12, 2020, 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading