गुवाहाटी, 14 मार्च : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे आसाम विधानसभेच्या (Assam Assembly Elections 2021) प्रचारावर आहेत. तिनसुकीया येथील एका प्रचार सभेत बोलतना त्यांनी आसामच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घुसखोरीबद्दल (infiltration) मोठं आश्वासन दिलं आहे. ‘आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे समाप्त करू’ असं आश्वासन शहा यांनी दिलं आहे. ‘जे सांगतो ते करतो’ आसाममध्ये सध्या भाजपाचं सरकार आहे. अमित शहा यांनी या भाषणात राज्य सरकारच्या कामांचा पाढा वाचला. ‘आम्ही जे सांगतो ते करतो. गेल्या 5 वर्षात आसाममध्ये आंदोलन नाही, तसंच दशतवादही नाही. राज्याचा विकास शांततेने होत आहे. आसामला घुसखोरांपासून मुक्त करण्याचं काम जवळपास झालं आहे. आम्ही दहशतवाद मुक्त आसाम करण्याचं आश्वासन दिलं होतं. 2000 पेक्षा जास्त जणांची शस्त्र खाली ठेवली आहेत. आम्हाला आणखी एक पाच वर्षांची टर्म द्या, घुसखोरी हा भूतकाळ बनेल. इथेही कधीही घुसखोरी होणार नाही. सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारवर विरोधी पक्ष देखील भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही,’ असा दावा शहा यांनी या सभेत केला.
Can Rahul, who has taken Badruddin Ajmal's support, protect Assam from infiltration? Can Assam be safe with Badruddin? Give us another 5 years, infiltration will be a thing of past in the state: Union Home Minister Amit Shah in Tinsukia, Assam pic.twitter.com/vFIeulEehs
— ANI (@ANI) March 14, 2021
आसामच्या जनतेपुढे आगामी विधानसभा निवडणुकीत दोन पर्याय आहेत, असं शहा यांनी सांगितलं. पहिला पर्याय सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा आणि आसाम गण परिषद आहे. तर दुसरा पर्याय राहुल गांधी आणि बदरुद्दीन अजमल यांचं नेतृत्व हा आहे,’ असं शहा यांनी स्पष्ट केलं. ( ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; ‘त्या’ घटनेबाबत निवडणूक आयोग म्हणालं… ) काँग्रेस सरकारच्या 15 वर्षांच्या राजवटीमध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांसाठी काहीही काम झालं नाही. आम्ही या कामगारांमधील गर्भवती महिलांसाठी योजना सुरू केली, असं अमित शहा या सभेत म्हणाले.