प्रशांत लीला रामदास,प्रतिनिधी
नवी दिल्ली, 23 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्राच्या विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहे. यामध्ये निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यामध्ये समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड केली आहे.
निवडणूक अभियान समिती अध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मीडिया समितीच्या अध्यक्षपदी कुमार केतकर तर जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शरद रणपिसे यांची नियुक्ती केली आहे.
तसंच काँग्रेसने महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली. यामध्ये विदर्भातील 2 कोकणातील 3 उत्तर महाराष्ट्रातील 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी सर्वच ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांची लोकसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे.
अशी आहे काँग्रेसची 'इलेक्शन'ची टीम
मल्लिकार्जुन खरगे - समन्वय समिती अध्यक्ष
अशोक चव्हाण - निवडणूक समितीप्रमुख
सुशील कुमार शिंदे - निवडणूक अभियान समिती
पृथ्वीराज चव्हाण - जाहीरनामा समिती
कुमार केतकर - मीडिया समिती
===============================