नवी दिल्ली 25 ऑक्टोबर: सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी महोत्सवात केलेल्या भाषणावर AMIMचे खासदार असदुद्दीन ओवेस यांनी जोरदार टीका केली आहे. CAA+NRC वरून काही लोक मुस्लिमांच्या भावना भडकविण्याचं काम करत आहेत. या कायद्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे असं भागवत यांनी सांगितलं होतं. त्यावरून ओवेसींनी भागवतांवर निशाणा साधला आहे.
ओवेसी म्हणाले, सरसंघचालक हे दिशाभूल करत आहेत. हे न ओळखण्याएवढे आम्ही काही लहान मुलं नाही. नागरीकत्वासाठी आम्हाला आमचं भारतीयत्व सिद्ध करायला लावणाऱ्या कुठल्याही कायद्याला आमचा विरोध राहणार आहे. या विषयावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी बोटचेपी भूमिका घेतली अशी टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले सरसंघचालक?
'भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमधून अनेक लोकं भारतात घुसखोरी करत असता. त्या राष्ट्रांमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे ती लोकं आपल्या राष्ट्रात येतात. म्हणून नागरीक संशोधन विधेयक मांडण्यात आलं. पण राजकीय आकसाने काही लोकांनी याला विरोध केला. या विधेयकाविरोधात चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले. गैर समज पसरविण्यात आलेत. यावर चर्चा सुरू असताना कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे या सर्व वादांवर पडदा पडला', असंही भागवत म्हणाले.
काही लोकांना भारतातली एकता खुपत असते. असे लोक विविधतेचं फुटीरतावादात रुपांतर करू पाहात आहे. तुकडे-तुकडे गँग अशा पद्धतीचं काम करत असल्याचा आरोपहीत्यांनी केला.
We're not kids to be 'misguided'. BJP didn't mince words about what CAA+NRC were meant to do. If it's not about Muslims, just remove all references to religion from the law? Know this: we'll protest again & again till there are laws that require us to prove our Indianness...[1] https://t.co/uccZ8JTjsi
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 25, 2020
आता लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. अनेक जण रोजगाराच्या शोधात बाहेर पडली आहे. नव्याने रोजगारासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोरोनामुळे शालेय शिक्षणावरही परिणाम झाला. शिक्षण व्यवस्था ठप्प झाली. आता सर्व जणांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण व्यवस्थेत झाले हा बदल आता सर्वांनी स्वीकारला आहे, असंही मतही भागवत यांनी व्यक्त केले.
'कोरोना हा विषाणू जीवघेणा आहे. त्याचे वेगळे वेगळे रूप पाहण्यास मिळाले आहे. पण तो इतकाही प्रतिकारक नाही. त्याचा प्रभाव इतका जाणवत नसला तरीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनावर कोणताही लस आली नाही. त्यामुळे कोरोनासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. पण खबरदारी घ्यावी लागणार आहे, असं आवाहनही भागवत यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.