अरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार?

अरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार?

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रॉपर्टीसंदर्भात एडीआर इंडिया वेबसाइटनं वृत्त दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट)निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. एम्स रुग्णालयात शनिवारी दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. जेटली यांनी आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती आणि अखेर शनिवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून ओळख असणाऱ्या अरुण जेटली यांच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. जेटलींच्या निधनानंतर त्यांच्या प्रॉपर्टीसंदर्भात चर्चा सुरू आहे. एडीआर इंडिया वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, 2018मध्ये राज्यसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जेटलींनी त्यांच्याजवळ 111 कोटी रुपये एवढी संपत्ती असल्याचं सांगितलं होतं.

(वाचा : जेटली यांच्याबद्दलच्या 'या' 5 खास गोष्टी, ज्यामुळे ते इतरांपेक्षा ठरले वेगळे)

1. एकूण 111 कोटी रुपयांची प्रॉपर्टी

ADR अहवालानुसार 2018मध्ये राज्यसभेचे सदस्य असताना जेटलींनी निवडणूक आयोगाकडे आपल्या मालमत्तेचा तपशील सादर केला होता. ज्यामध्ये त्यांनी आपली एकूण संपत्ती 111 कोटी 42 लक्ष 33 हजार 556 रुपये एवढी असल्याचं सांगितलं होतं.

2. 9 कोटी रुपयांचं कर्ज

दरम्यान, अरुण जेटलींच्या नावावर 9 कोटी 56 लक्ष 17 हजार 471 रुपयांचं कर्ज होतं. दरम्यान भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदे सांभाळली आहेत. तसंच पक्षाच्या अर्थ व्यवस्थेचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

(वाचा : काय आहे Soft tissue sarcoma ज्याच्याशी अरुण जेटलींची झुंज अपयशी ठरली?)

3. 16 लाख रुपयांची रक्कम

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, अरुण जेटली आणि त्यांच्या पत्नीजवळ एकूण 16 लाख 58 हजार 600 रुपयांची रोखरक्कम होती. यामध्ये अरुण जेटलींकडे 11 लाख 53 हजार रुपये तर पत्नीजवळ 5 लाख 05 हजार 600 रुपये होते.

4. PPFमध्येही गुंतवणूक

अरुण जेटली यांनी PPFमध्ये गुंतवणूक केली आहे. अरुण जेटली यांनी 48 लाख रुपये PPFमध्ये जमा केले होते. दरम्यान, त्यांच्या नावावर कोणतीही LIC पॉलिसी दाखल नव्हती.

5. तीन कार

अरुण जेटली यांच्याकडे दोन मर्सिडीज बेंझ कार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे एक टोयोटा फॉर्च्यूनर कारदेखील आहे.

(पाहा : VIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा 1952 ते 2019 जीवनप्रवास)

6. दागदागिने

अरुण जेटली आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 1 कोटी 56 लक्ष 96 हजार 740 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर 7 लाख रुपयांचे चांदीचे आणि 45 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत.

7. प्रॉपर्टी

रिअल इस्टेटमध्ये त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनुसार त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. माहितीनुसार, अरुण जेटली आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील उच्चभ्रू परिसरातही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 77 कोटी रुपये एवढी आहे.

8. अरुण जेटलींच्या कुटुंबातील सदस्य

अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर रोजी दिल्लीत झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव महाराज किशन जेटली असं होतं. त्यांचे वडील पेशानं वकील होते. त्यांच्या आईचं नाव रतन प्रभा जेटली होतं. जेटलींच्या पश्चात पत्नी संगीता, पुत्र रोहन, त्यांची पत्नी, कन्या सोनाली असा परिवार आहे. जेटलींचं दोन्ही मुलं त्यांच्याप्रमाणेच पेशानं वकील आहेत. कन्या सोनालीचं 2015मध्ये एका व्यावसायिका आणि वकील जयेश बख्शी यांच्यासोबत विवाह झाला.

VIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading