नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. जेटली यांनी आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







