
सोनमर्गला पिकनिकसाठी आलेले श्रीनगरचे 4 लोक सिंध नदीत त्यांच्या वाहनासह अडकले. त्यांनी बालटालजवळ सिंध नदीच्या पलीकडच्या काठावर त्यांच्या चारचाकीतूनच जाण्याचा प्रयत्न केला.

अमरनाथ यात्रेसाठी बालटाल-डोमेल येथे तैनात असलेल्या बटालियनच्या भारतीय सैन्याच्या गस्त पथकानं सिंध नदीत हे वाहन पाहिलं.

बालटालजवळ या लोकांनी स्वतःच्या चारचाकी वाहनातून सिंध नदीच्या पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याच्या गस्त पथकानं हे वाहन नदीत अडकलेलं पाहिलं आणि तत्काळ रेस्क्यू मोहिमेला सुरुवात केली.

भारतीय लष्कराचं एक बचाव पथक तत्काळ रिकव्हरी वाहन आणि आवश्यक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झालं आणि चौघांची सुखरूप सुटका केली.

सिंध नदीतून वाहन बाहेर काढण्यासाठी लष्करानं त्यांचा जेसीबी आणि रिकव्हरी वाहन वापरलं. चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.




