मराठी बातम्या /बातम्या /देश /

अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मशिदीचे आर्किटेक्ट आहेत हे प्राध्यापक अख्तर, कसं आहे डिझाइन?

अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मशिदीचे आर्किटेक्ट आहेत हे प्राध्यापक अख्तर, कसं आहे डिझाइन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजनही झालं. याचबरोबर मशिद बांधणीचा विषयही पुढे सरकला आहे. सरकारने दिलेल्या जागेत जी मशीद उभी राहणार आहे तिचं डिझाइनही आता प्रसिद्ध झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजनही झालं. याचबरोबर मशिद बांधणीचा विषयही पुढे सरकला आहे. सरकारने दिलेल्या जागेत जी मशीद उभी राहणार आहे तिचं डिझाइनही आता प्रसिद्ध झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजनही झालं. याचबरोबर मशिद बांधणीचा विषयही पुढे सरकला आहे. सरकारने दिलेल्या जागेत जी मशीद उभी राहणार आहे तिचं डिझाइनही आता प्रसिद्ध झालं आहे.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाच्या जन्मभूमीवर विशाल राम मंदिर (Ayodhrya Ram Mandir) उभारण्याचा निकाल 9 नोव्हेंबर 2019 ला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुन्नी वक्फ बोर्डला (Sunni Waqf Board) मशिद उभी करण्यासाठी पाच एकर जागा द्यावी असा आदेशही न्यायालयाने दिला होता. या ऐतिहासिक निर्णयाचं देशातील सर्वधर्मीय नागरिकांना स्वागत केलं आणि देशातील बंधुत्वाचं दर्शन घडवलं. पुढची पायरी म्हणजे गेल्या वर्षात श्रीराम मंदिराच्या डिझाइनमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून ते सादर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजनही झालं. याचबरोबर मशिद बांधणीचा विषयही पुढे सरकला आहे. सरकारने दिलेल्या जागेत जी मशीद उभी राहणार आहे तिचं डिझाइनही आता प्रसिद्ध झालं आहे. हे डिझाइन पाहिल्यावर पारंपरिक मशिदी पाहिलेल्या प्रत्येकाला आश्चर्यच वाटले त्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली. हे डिझाइन तयार केलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट आणि जामिया मिलिया विद्यापीठातील आर्किटेक्चर विभागाचे माजी प्रमुख प्रा. सय्यद मोहम्मद अख्तर.

असं आहे मशिदीचं डिझाइन

अयोध्येतील धनीपूर गावात ही प्रस्तावित मशिद उभारली जाणार असून इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने (IICF) नुकतंच या मशिदीचं मॉडेल प्रसिद्ध केलं आहे. हे मॉडेल पारंपरिक मशिदींसारखं नाही त्यामुळे याचं डिझाइन आधुनिक आहे. प्रस्तावित मॉडेलमध्ये मशिदीची इमारत अंडाकार असून त्यामध्ये कुठेही पारंपारिक घुमट नाही. ही मशिदीचा परिसर 1700 चौरस मीटरचा असेल यात पुढच्या बाजूला दोन मिनार असतील आणि स्किलेट ग्लासचा एक घुमट असेल. तसंच इथं मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि ग्रंथालयही असेल.

सस्टेनेबल मॉडेल

प्रा. अख्तर यांनी या आधी जामिया मिलिया विद्यापीठातील टीटीई बिल्डिंग, दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील शेख अली यांची मजार, अरब देशांतील सरायमधील सय्यद यासीन यांची मजार व मशिद अशा वास्तू उभारल्या आहेत. अख्तर यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयात संशोधन केलं आहे. त्यासाठी त्यांना डी. लिट्. पदवी देऊन गौरवण्यात आलंय. या मशिदीत विजेसाठी सौर उर्जेचा वापर केला जाणार असून ही इमारत ग्रीन मॉडेल प्रमाणेच असेल. अख्तर यांच्या दूरदृष्टीमुळेच असं मॉडेल तयार करण्यात आलं आहे.

प्रा. अख्तर यांना आधुनिकतेचा ध्यास

प्रा. अख्तर हे जागतिक स्तरावर नावाजलेले आर्किटेक्ट आणि त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. त्यामुळे पारंपरिक व आधुनिक वास्तुशैलींचा मिलाफ करण्यात ते निपुण आहेत. तसंच आधुनिक विषयांचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यामुळेच त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आर्किटेक्चर विभागात त्यांनी आर्किटेक्चर पेडागॉजी, आर्क बिल्डिंग सर्व्हिसेस, आर्क मेडिकल आर्किटेक्चर, आर्क रिक्रिएशन आर्किटेक्चर आणि आर्क अर्बन रिजनरेशन या विषयांतील मास्टर्स डिग्री अभ्यासक्रम सुरू केले. हे अभ्यासक्रम व्यावसायिकतेला धरून आणि आधुनिक स्थापत्यशैलीशी निगडित असल्यामुळे प्रचंड प्रसिद्ध झाले. प्रा. अख्तर यांना विविध विषयांचं सखोल ज्ञान असून ते या विषयावर व्याख्यानंही देतात. आर्किटेक्चर व पर्यावरण या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. बर्फ पर जमी आग हे त्यांचं कवितांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे.

मशिदीची आणखी वैशिष्ट्य

प्रा. अख्तर यांच्या सल्ल्यानुसार तयार केलेली ही मशिद 1700 चौरस मीटर परिसरात उभारली जाईल. यात 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल. मशिद इतकी मोठी आहे की तिथं एकावेळी 2000 जण नमाज पठण करू शकतील. या मशिदीत ग्रंथालय आणि इंडो-इस्लामिक कल्चरल लिटरेचरचं प्रकाशन करण्याची व्यवस्थाही केली आहे. या विषयात संशोधनही केलं जाईल.

First published:

Tags: Ayodhya, Ayodhya ram mandir, Ram Mandir, Ram mandir and babri masjid